Pune Metro Line 3: 12 रुपयांत प्रवास, पण प्रतीक्षा कायम! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला प्रशासनाचा 8 वा मुहूर्त

Pune Metro Line 3 Hinjawadi Metro Shivajinagar Metro:हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी प्रशासनाकडून आतापर्यंत तब्बल ८ वेळा मुहूर्त जाहीर करण्यात आले आहेत, ज्यामुळे पुणेकरांच्या पदरी केवळ प्रतीक्षाच पडली आहे.
Pune metro, devendra fadnavis
Pune metro, devendra fadnavisSarkarnama
Published on
Updated on

Pune News: पुणेकरांची आणि विशेषतः आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या नोकरदारांची वाहतूक कोंडीतून सुटका करणाऱ्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिका ३ च्या सेवांविषयी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम अखेर अंतिम टप्प्यात आले आहे. ही सेवा लवकरच पुणेकरांच्या सेवेत दाखल होणार आहे.

पहिले १२ स्टेशन्स ३० जुलै पर्यंत सज्ज!

पुणे आयटी सिटी मेट्रोचे मुख्य मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल कुमार सैनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील स्थानकांचे काम ३० जुलैपर्यंत पूर्ण झाले आहे. पहिल्या टप्प्यात माण ते आर.के.लक्ष्मण संग्रहालय बाणेर दरम्यान एकूण १२ स्थानकांवर मेट्रो धावणार आहे. ज्याची लांबी १३.३ किलोमीटर आहे. तांत्रिकदृष्ट्या या मार्गिकेचे काम पूर्ण झाले असून, आता राज्य सरकारकडून उद्घाटनाची तारीख ठरवली जाईल. मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीनंतर लवकरच ही मेट्रो पुणेकरांच्या प्रवासासाठी खुली केली जाईल.

किती असणार तिकीट दर?

मेट्रो प्रवासाचे भाडे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे असणार आहे. अनिल कुमार सैनी यांच्या माहितीनुसार, किमान तिकीट दर अवघ्या १२ रुपयांच्या आसपास असणार आहे.

दुसऱ्या टप्प्याचे नियोजन

या प्रकल्पाचा दुसरा टप्पा बालेवाडी हायस्ट्रीट ते जिल्हा न्यायालय असा असणार आहे, ज्यामध्ये ११ स्थानके असून एकूण अंतर १० किमी आहे. या दुसऱ्या टप्प्याचे बरेचसे काम ऑगस्टपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. संपूर्ण हिंजवडी ते शिवाजीनगर मार्ग पुढील वर्षाच्या मार्च २०२७ पर्यंत पूर्णपणे कार्यान्वित होईल. गणेशखिंड रस्त्यावर मेट्रोचे काम सुरू करण्यास झालेल्या विलंबाचा फटका या प्रकल्पाला बसला आहे. यामुळे प्रकल्पाच्या खर्चात सुमारे २० टक्क्यांनी वाढ झाली असून, वाढीव खर्चाचा हा बोजा पुणे आयटी सिटी मेट्रो रेल कंपनी उचलणार आहे.

Pune metro, devendra fadnavis
Parliament Monsoon Session 2026: पावसाळी अधिवेशनापूर्वी खासदारांसाठी लोकसभा सचिवालयाचे नवे आदेश

8 वा मुहूर्त ...

हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी प्रशासनाकडून आतापर्यंत तब्बल ८ वेळा मुहूर्त जाहीर करण्यात आले आहेत, ज्यामुळे पुणेकरांच्या पदरी केवळ प्रतीक्षाच पडली आहे. सुरुवातीला मार्च २०२५ चा मुहूर्त हुकल्यानंतर सप्टेंबर २०२५, डिसेंबर २०२५, मार्च २०२६, मे २०२६, १५ जून २०२६ आणि अगदी अलीकडे १५ जुलै २०२६ अशा एकापाठोपाठ एक सात तारखा फोल ठरल्या.

प्रतीक्षा कधी संपणार?

आता अखेर जुलैअखेरीस अथवा ऑगस्ट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात ही मेट्रो धावण्याचा आठवा नवा मुहूर्त देण्यात आला आहे. या वारंवार बदलणाऱ्या तारखांमुळे आणि कामाला झालेल्या विलंबामुळे प्रकल्पाच्या खर्चात सुमारे २० टक्क्यांनी वाढ झाली आहे, सोबतच वाहतूक कोंडीत अडकणाऱ्या लाखो आयटी कर्मचाऱ्यांची आणि पुणेकरांची प्रतीक्षा आणखीनच ताणली गेली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com