Mohol Panchayat Samiti : ‘निधीवाटपात भाजपला साथ देत विरोधकांना केलं टार्गेट?’: मोहोळच्या बीडीओला ZP सीईओंचा दणका

Fund Issue : मोहोळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विवेक जमदाडे यांच्यावर निधीवाटपात भाजपला सहकार्य केल्याचा आरोप झाला. चार दिवसांच्या आंदोलनानंतर त्यांच्याकडील पदभार काढून तेजश्री गायकवाड यांच्याकडे सोपविण्यात आला.
Mohol Panchayat Samiti
Mohol Panchayat Samiti Sarkarnama
Published on
Updated on

Solapur, 19 September : निधीवाटपात सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला सहकार्य केल्याचा आरोप मोहोळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विवेक जमदाडे यांच्यावर करण्यात आला होता. त्यावरून विरोधी पक्षाचे गटनेते बाळासाहेब गायकवाड यांनी जमदाडेंच्या विरोधात चार दिवस आंदोलन केले. त्याची दखल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी घेत जमदाडे यांच्याकडील पदभार काढून घेण्यात आला आहे. गटविकास अधिकारीपदाचा पदभार सहायक गटविकास अधिकारी तेजश्री गायकवाड यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

दरम्यान, आम्ही गेली चार दिवस केलेल्या आंदोलनाला यश आल्याचा दावा मोहोळ पंचायत समितीमधील विरोधी पक्षाचे गटनेते बाळासाहेब गायकवाड यांनी केला आहे.

मोहोळ पंचायत समितीला 7 कोटी 29 लाख रुपयांचा विकास निधी मिळाला आहे. या निधीचे समान पद्धतीने वाटप करण्यात यावे. बैठकीच्या माध्यमातून चर्चा करून त्याचा कृती आराखडा तयार करावा, अशी मागणी गटनेते गायकवाड यांनी केली होती.

सध्या पंचायत समितीमध्ये भाजपची सत्ता आहे. त्यांचे सात सदस्य आहेत, तर विरोधकांचे पाच सदस्य आहेत. मात्र, विकास निधीचे समान वाटप न करता ज्या पंचायत समिती गणातून भाजपचा सदस्य विजयी झाला आहे, त्या गणाला सभापती अस्लम चौधरी यांनी मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे, तर ज्या गणातून विरोधकांचा सदस्य विजयी झाला, त्या ठिकाणी मात्र अत्यंत तोकडा निधी दिला आहे.

Mohol Panchayat Samiti
Rajan Patil : सोलापूर डीसीसीबाबत देवेंद्र फडणवीसांनी कोणता आदेश दिला?; राजन पाटलांनी केला गौप्यस्फोट...

गटविकास अधिकारी जमदाडे यांनी या संपूर्ण प्रकाराला सहकार्य केल्याचा आरोप गटनेते गायकवाड यांनी केला होता. गटविकास अधिकारी जमदाडे यांच्या विरोधात राम हिंगणी, हिंगणी निपाणी, आष्टे, कामती, खुनेश्वर, घाटणे या गावांच्या नागरिकांनी गटविकास अधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलने, उपोषणे केली होती. त्यामुळे गटविकास अधिकारी जमदाडे चर्चेत आले होते.

गटविकास अधिकाऱ्यांच्या गैरप्रकाराची चौकशी करून त्यांची तातडीने बदली करावी, जोपर्यंत बदली होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, अशी भूमिका विरोधी सदस्यांनी घेतली होती. तसेच, पंचायत समितीसमोर सलग चार दिवस आंदोलन केले होते.

Mohol Panchayat Samiti
Solapur DCC Bank : राजन पाटील, जयवंतराव जगताप, नारायण पाटील अन्‌ आवताडेंनी घेतली राजेंद्र राऊतांची भेट; जिल्हा बॅंक निवडणुकीबाबत मोठ्या घडामोडी

कृती आराखडा आम्हाला विश्वासात न घेता केला आहे असा आरोप करीत तो रद्द करावा अशी ही मागणी विरोधकांनी केली होती. अखेर या आंदोलनाची दखल मुख्य कार्यकारी अधिकारी जैन यांनी घेत गटविकास अधिकारी जमदाडे यांच्या कडील पदभार काढून तो सहाय्यक गटविकास अधिकारी तेजश्री गायकवाड यांच्याकडे दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com