Ajit Pawar : ‘मी अवघ्या 3.5 लाखांत खासदार झालो; पण आता एका जेवणालाही तेवढे पुरत नाहीत’ : अजितदादांनी सांगितला किस्सा

Sharad Butte Patil Join NCP : भाजपचे नेते शरद बुट्टे पाटील यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी अजितदादांनी लोकसभा निवडणूक आणि वाढत्या निवडणूक खर्चावर भाष्य केले.
Ajit Pawar-Sharad Butte Patil
Ajit Pawar-Sharad Butte Patil Sarkarnama
Published on
Updated on

Pune, 19 January : भारतीय जनता पक्षाचे उत्तर पुणे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांनी आज (ता. 19 जानेवारी) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात अजितदादांनी आपल्या लोकसभा निवडणुकीचा किस्सा सांगितला. मी अवघ्या साडेतीन लाखांत खासदार झालो होतो; पण आता एका जेवणालाही तेवढे पुरत नाहीत, असे सांगून वाढलेल्या निवडणूक खर्चाबाबत भाष्य केले आहे.

पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती शरद बुट्टे पाटील (Sharad Butte Patil ), माजी उपसभापती चांगदेव शिवेकर, सुनीता बुट्टे पाटील, श्रद्धा मांडेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेखा ठाकर, भाजपचे मंडल अध्यक्ष सुनील देवकर, दत्तात्रेय टेमगिरे, काळूराम पिंजण, सुरेश पिंगळे, राहुल गवारी, रामदास कोळेकर यांच्यासह सरपंच, पदाधिकारी आदींनी प्रवेश केला. त्या वेळी ते बोलत होते.

खेड तालुक्यातील जनतेने विधानसभेला राष्ट्रवादीला संधी दिली नसली तरी जिल्हा परिषदेला संधी द्यावी. विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही. शरद बुट्टे पाटील यांनी आजपर्यंत जिल्हा परिषदेत चांगले काम केले आहे. त्यांचा अभ्यास जिल्ह्याच्या विकासासाठी फायदेशीर ठरेल. तुमचे आमदार माझ्याशी गोडगोड बोलतात. आज निवडणुकीसाठी कोणाला संधी मिळाली नसली तरी भविष्यात सर्वांचा विचार केला जाईल, असेही अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले.

माजी आमदार दिलीप मोहिते म्हणाले की, माझ्या आमदारकीच्या निवडणुकीत पाईट-आंबेठाण गटातील लोक मला विसरले. पण आता तरी विसरू नका. ज्यांनी पक्ष अडचणीत आणला, त्यांना पक्षात अजिबात प्रवेश नको. आम्ही मंजूर केलेल्या रस्त्यांचे भूमिपूजन आताचे लोक करतात. मी सहा वेळा आमदारकी लढविली. माझ्या इतका या गटातील लोकांना कोणी ओळखत नाही. या भागात आलेले पार्सल परत तिकडे पाठवा. हिंमत असेल तर तुमच्या भागात उभे राहा.

Ajit Pawar-Sharad Butte Patil
Bhalke Group : परिचारकांच्या सत्तेला सुरुंग लावणाऱ्या भालके गटात अवघ्या महिनाभरात रंगले नाराजीनाट्य

शरद बुट्टे पाटील म्हणाले की, माझ्या आयुष्यातील पहिली संधी मला अजितदादांनी दिली; म्हणून माझे नेतृत्व तयार झाले. आताचे लोकप्रतिनिधी विकासाच्या गप्पा मारतात. पण, त्यांना एकही पूल किंवा साकव करता आलेला नाही. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचीच सत्ता येणार आहे. माझा आजचा प्रवेश हा फक्त विकासासाठी आहे. आमच्या तालुक्याचे आमदार फक्त लग्न, दशक्रिया आणि नातेवाईकांचे हित जोपासण्यासाठी फिरतात. आजवर कोणत्याही आमदाराने बाहेरचा उमेदवार कुठे दिला नाही. पण आमच्या तालुक्यातील आमदारांनी याला छेद दिला.

दिलीप मोहिते आणि बुट्टे पाटील एकत्र आले, तर खेड तालुक्याचे राजकारण बदलेल. लवकरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होतील, असेही सुनील चांदेरे यांनी सांगितले.

चांदेरेंना आलेल्या चिठ्ठीत नेमकं काय?

सुनील चांदेरे भाषण करताना त्यांना ‘अजितदादांना यायला थोडा वेळ आहे, तुमचे भाषण जरा लांबवा,’ अशी चिठ्ठी देण्यात आली. पण, चांदेरे यांना वाटले की भाषण थांबवा. त्यामुळे त्यांनी भाषण आवरते घेतले. हे लक्षात येताच निवेदकाने थांबवा नाही, तर लांबवा असे लक्षात आणून दिले. त्यावर उपस्थितांमध्ये मोठा हशा झाला.

Ajit Pawar-Sharad Butte Patil
Shinde-Bagal Yuti : मोठी बातमी : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येताच संजयमामा शिंदे अन्‌ रश्मी बागल यांच्यात आघाडी; पालकमंत्र्यांची यशस्वी शिष्टाई

बारामती बाराचीच असणार....

अजित पवार यांनी ‘कोणत्या पंचायत समितीत किती सदस्य आहेत?’ याचा उल्लेख केला. खेड पंचायत समिती १६ ची आहे. मुळशी पंचायत समिती ६ ची आहे, असा उल्लेख केला. बारामती ही १२ची आहे, असे सांगितले. त्यांच्या या विधानावर उपस्थितांमध्ये हशा पिकला. बारामती ही बाराचीच असणार, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com