Supriya Sule News : भुजबळ यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याचे कॅबिनेटमध्ये कोणी ऐकत नाही..! सुप्रिया सुळे यांचा टोला..

cabinet not listens to a senior leader Chhagan Bhujbal : बाहेर येऊन बोलावे लागते, हे दुर्दैव आहे.
Chhagan Bhujbal, Supriya Sule.
Chhagan Bhujbal, Supriya Sule.Sarkarnama
Published on
Updated on

Supriya Sule News : महाराष्ट्राच्या ज्येष्ठ नेत्यांना कॅबिनेटमध्ये बोलू दिले जात नसल्याने त्यांना बाहेर येऊन बोलावे लागते, हे दुर्दैव आहे. याचे वाईट वाटत असल्याची खंत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे. तर कॅबिनेटमध्ये सध्या गँगवार सुरू असून छगन भुजबळ यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याचे कोणी ऐकत नाही, असा टोला त्यांनी भुजबळ यांना लगावला आहे.

भुजबळ यांनी देखील त्यांच्या मनातील नाराजी बोलून दाखविली असल्याचे त्यांनी सांगितले. पुणे (Pune) येथील सातारा रस्ता परिसरात एका कार्यक्रमासाठी खासदार सुळे आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राष्ट्रवादी (NCP) काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्ष व खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी निशाणा साधला.

Chhagan Bhujbal, Supriya Sule.
Solapur Politics : सोलापूरचे दोन्ही देशमुख एकत्र आले; पण सुभाषबापूंचा 'तो' उल्लेख विजय देशमुखांना खटकला

त्या म्हणाल्या, भुजबळ यांचा कॅबिनेटमध्ये योग्य प्रकारे मानसन्मान होत नाही. त्यांचे कोणीही ऐकत नाही, याविषयी त्यांनी अनेकदा बोलून दाखविले आहे. "राज्यात लोकशाही आहे, दडपशाही दिल्लीत आहे. आमच्या कुटुंबाबद्दल तुम्हाला माहिती आहे. प्रत्येक वेळी राजकारणात येण्यासाठी अशी स्पर्धा आयोजित करतात.''

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अशा शब्दांत खासदार सुळे यांनी अजित पवार लोकसभा लढविणार आणि योगेंद्र पवार यांच्या राजकारणातील प्रवेशाबाबत विचारलेल्या प्रश्‍नावर उत्तर दिले. तसेच शरद पवार, राहुल गांधी, सोनिया गांधी व उद्धव ठाकरे यांच्याशी दिल्लीत चर्चा झाली आहे. येत्या 15 दिवसांतच लोकसभेच्या जागा वाटपाची माहिती तुम्हाला दिली जाईल, तुम्ही काळजी करू नका'', असे खासदार सुळे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलताना खासदार सुळे म्हणाल्या, ते पूर्वी राज्याचे गृहमंत्री होते. त्यावेळी देखील नागपूर "क्राईम कॅपिटल' होते. आता देखील तेच गृहमंत्री असूनही नागपूरमधील गुन्हे वाढले आहेत. फडणवीस हे गृहमंत्री झाले की नागपूरमध्ये गुन्हे कसे वाढतात ? अमली पदार्थ पुरवठा करणाऱ्यांसंदर्भात मोठी माहिती पुढे येईल, असे फडणवीस म्हटले होते, त्याचे नेमके काय झाले. जालना येथील लाठीहल्ल्यास गृहमंत्रीच जबाबदार आहेत, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

(Edited by Amol Sutar)

Chhagan Bhujbal, Supriya Sule.
Shivsena Political News : ठाकरे गटाच्या शिवसेनेचा अधिवेशनाच्या निमित्ताने भाजपला 'धक्का'?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com