Pimpri-Chinchwad News : लोकसभा निवडणूक तयारीचा भाग म्हणून भाजपने महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांच्या निवडणूक प्रमुखांची नुकतीच (ता.८) नियुक्ती केली. त्यात शिरूरची ही जबाबदारी भोसरीचे पक्षाचे आमदार आणि पिंपरी-चिंचवड शहर जिल्हाध्यक्ष महेश लांडगे (Mahesh Landge) यांच्यावर सोपविण्यात आली. या नियुक्तीनंतर चार दिवसांतच ते कामाला लागले असून सहाही विधानसभा निवडणूक प्रमुखांची त्यांनी काल बैठक घेतली.
पक्षाने दिलेली जबाबदारी सक्षमपणे निभावणार असून, शिरूरमधील (Shirur) पक्षाचा उमेदवार बहुमताने निवडून आणणार आहे, असा निर्धार नव्या नियुक्तीच्या दिवशीच लांडगेंनी व्यक्त केला होता. त्यादृष्टीने त्यांनी लगेचच तयारीही सुरू केली. काल मतदारसंघाचा दौरा त्यांनी केला. त्याची सुरवात शिरूरमधील सर्व विधानसभा प्रमुखांसह ओझरच्या गणरायाचे दर्शनाने केली.
नंतर बैठक घेतली. मतदारसंघनिहाय मोर्चेबांधणी करुन भाजपच्या विचाराचा उमेदवार निवडून आणण्यासाठी एकोप्याने प्रयत्न करण्याचा निर्धार तीत करण्यात आला. पक्ष संघटन आणि निवडणूक नियोजनाबाबतही चर्चा करण्यात आली. आगामी काळात भाजप (BJP) सरकारची विकासकामे आणि कल्याणकारी योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार केला गेला.
पक्षाने दिलेला उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही सर्व सहकारी, पदाधिकारी आणि भाजप विचारांचे कार्यकर्ते सक्षमपणे काम करणार आहोत, असे लाडगेंनी या बैठकीनंतर सांगितले. जुन्नर, भोसरी, हडपसर, खेड, शिरूर-हवेली विधानसभा निवडणूक प्रमुख अनुक्रमे आशा बुचके, विकास डोळस, योगेश टिळेकर, अतुल देशमुख, प्रदीप कंद आणि लोकसभा समन्वयक ॲड. धर्मेंद्र खांडरे आदी या बैठकीला उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.