Kundamala Bridge Collapsed : तो बोर्ड, पोलिस अन् पर्यटक..! गिरीश महाजनांनी सांगितलं चूक कुणाची?

Cause Behind Kundamala Bridge Collapse : कुंडमळा येथील पूल 1992 साली पादचाऱ्यांसाठी चालण्यासाठी तयार करण्यात आलेला होता. या ठिकाणी आज सुटी आणि पावसाळी वातावरण असल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी गर्दी केली होती.
The collapsed Kundamala Bridge after excessive tourist load led to structural failure, as confirmed by Minister Girish Mahajan.
The collapsed Kundamala Bridge after excessive tourist load led to structural failure, as confirmed by Minister Girish Mahajan. Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा गावाजवळ इंद्रायणी नदीवरील लोखंडी पुल कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास 40 जणांना वाचविण्यात यश आले आहे. त्यापैकी 6 जणांची प्रकृती गंभीर आहे. काही लोक नदीत वाहून गेल्याची शक्यता आहे, ज्यांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.

घटनास्थळाला मंत्री गिरीश महाजन यांनी भेट दिली. त्यानंतर माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असून 1992 साली पादचाऱ्यांसाठी चालण्यासाठी हा मार्ग तयार करण्यात आलेला होता. या ठिकाणी आज सुटी आणि पावसाळी वातावरण असल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी गर्दी केली होती.

पुलाच्या क्षमतेपेक्षा जास्त लोक त्या पुलावर उभे राहिलेले होते. त्यामुळे हा फुल कोसळला आणि ही दुर्दैवी घटना घडली. सर्व यंत्रणा बचाव कार्यामध्ये लागलेल्या आहेत. काही लोक वाहून गेल्याची शक्यता देखील वर्तवण्यात ते लोक नेमकी वाहून गेलेत का, पाण्याच्या प्रवाहातून बाहेर आलेत, त्याचा शोध घेण्यात येत आहे. नेमके किती लोक या पुलावर होते याची संख्या सांगता येणार नाही. मात्र मोठा प्रमाणात गर्दी या पुलावर पर्यटकांनी केली होती, असं महाजन म्हणाले.

The collapsed Kundamala Bridge after excessive tourist load led to structural failure, as confirmed by Minister Girish Mahajan.
Kundmala Bridge Collapse Video : कुंडमळ्यातील पूल दुर्घटनेचा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ समोर

पूल हा धोकादायक स्थितीमध्ये आहे. याबाबत या ठिकाणी पाटी देखील लावण्यात आली होती. तरीदेखील पर्यटकांनी मोठ्या संख्येने गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. पावसाळ्यामध्ये अनेक ठिकाणी पर्यटक गर्दी करताना पाहायला मिळत आहे. वारंवार सांगून देखील, सूचना देऊन देखील पर्यटकांची गर्दी अशा धोकादायक ठिकाणी होताना पाहायला मिळत असल्याची नाराजीही महाजन यांनी व्यक्त केली.

आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक आले होते. बोर्ड लावलेला असताना देखील तो पाहिला नाही आणि पर्यटकांनी ऐकलं देखील नाही, अशी शक्यता आहे. या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होत असेल तर त्या ठिकाणी पोलिस असणे आवश्यक होते. त्यामुळे पोलीस का नव्हते, याबाबत देखील चौकशी करणार असल्याचं महाजन यांनी सांगितलं.

The collapsed Kundamala Bridge after excessive tourist load led to structural failure, as confirmed by Minister Girish Mahajan.
गँगस्टर अरूण गवळीची लेक ठाकरेंना धक्का देणार

पूल धोकादायक असल्याने पर्यायी पूल उभारण्यासाठी सात-आठ कोटीचा टेंडर देखील मंजूर करण्यात आले आहे. लवकरच याचं काम देखील सुरुवात करण्यात येणार होतं. मात्र त्यापूर्वीच ही दुर्घटना घडली आहे. पूल कोणी वापरू नये गर्दी करू नये, असा बोर्ड लावण्यात आला होता. हा पायी येण्या जाण्यासाठी पूल उभारण्यात आला होता. मात्र त्या ठिकाणी दोन-चारशे लोक पूर पाहण्यासाठी येऊन उभे राहिले, त्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली, असा दावा महाजन यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com