Congress News : गुन्हा करून तो नाकारणे ही भाजपची संस्कृती; वारकऱ्यांच्या झटापटीवरून काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार आक्रमक..

Hanumant Pawar News : वारकरी आणि पोलीस यांच्यात झालेल्या झटापटीवरून काँग्रेसचा...
Congress News :
Congress News :Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune News : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळ्याला रविवारी गालबोट लागले होते. यावरुन राजकारण पेटलं आहे. वारी सोहळ्यात इतिहासात पहिल्यांदाच पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. यावरुन संमिश्र प्रतिक्रिया समोर येत आहेत.

पोलिसांनी वारकऱ्यांवर केलेल्या हल्ल्याबाबतचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यात एका तरुण वारकऱ्याने त्याच्यावर पोलिसांनी केलेल्या मारहाणीबाबत सांगितले आहे. यावरून आता राजकीय वातावरण तापत आहे, विरोधकांकडून याबाबत शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. (Latest News Marathi)

Congress News :
Dilip Walse-Patil on Maharashtra Politics: 'नक्की आपले कोण आहेत, याची माहिती आपल्याला पाहिजे..; दिलीप वळसे-पाटील असं का म्हणाले...

"आळंदी मंदिर परिसरात पोलिस आणि वारकऱ्यांमधील झटापट झाली. ज्या वारकरी बांधवाना मारहाण करण्यात आली त्यांनी स्वतः मारहाणीचा प्रसंग व्हिडीओद्वारे सांगितला. कधीही वारीत असा दुर्दैवी प्रसंग घडला नाही. प्रशासन आणि पोलिसांच्या ढिसाळ नियोजनाचा हा पुरावा होता.ढिसाळ नियोजन, संवादाचा अभाव आणि बळजबरी करण्याची पोलिसांची वृत्ती हे शासनाचे अपयश असताना उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस झालेली घटनाच नाकारण्यात दंग आहेत, महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रवक्ते हणमंत पवार (Hanumant Pawar) यांनी शिंदे फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला.

हणमंत पवार पुढे म्हणाले, "खरं म्हणजे यां प्रकाराची संपूर्ण जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री फडणवीसांनी मारहाण झालेल्या तरुण वारकऱ्यांची माफी मागून दोषी पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करायला पाहिजे होतं. पण गुन्हा करून तो साळसूदपणे नाकारायचा या पूर्वसुरींच्या शिकवणीला जागत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे वारकऱ्यांना मारहाण झाल्याची घटनाच नाकारत आहेत."

"महाराष्ट्रातील सरकार भाजपाने राज्यपाल कोश्यारीला हाताशी धरून पाडलं, शिवसेना पक्षाचे आमदार भाजपाने पळविले, कोविड संकट काळात महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी लाख भानगडी केल्या, आताही राज्यात जातीय, धार्मिक तणाव निर्माण करण्यात कितीतरी भाजपा आमदार, खासदार, पदाधिकारी विखारी वक्तव्य करून हातभार लावतं आहेत. असं असलं तर हे सर्व नाकारून आपलं सरकार चालवण्यातलं अपयश देवेंद्र फडणवीस लपवू पाहतं आहेत. याचं रणनीतीतून आता वारकऱ्यांना मारहाण झालीच नाहीचा बनाव रचून माध्यमात खोटे पसरवले जातं आहे, असेही हनुमंत पवार म्हणाले.

Congress News :
Ajit Pawar News : अजितदादांची गिरीश महाजनांनी केली स्तुती; म्हणाले, "राज्यात अजितदादा सरसच पण..."

"गांधी हत्या करून त्यात आम्ही नव्हतोच म्हणणारे, ब्रिटिशांची माफी मागून माफी मागितलीच नाही म्हणणारे, बाबरी मस्जिद पाडून आम्ही नव्हतोच म्हणणारे, शेतकऱ्यांच्या अंगावर वाहन चालवून त्यांचा जीव घेऊन आम्ही तिथं नव्हतोच म्हणणारे, महिला मुलींवर अत्याचार करून त्या न्यायासाठी रस्त्यावर उतरल्यावर अत्याचार झालाच नाही म्हणणारे आणि वारकऱ्यांना मारहाण करून मारहाण झालीच नाही म्हणणारे एकाच राजकीय संस्कृतीतील आहेत, हें जनता आता ओळखून आहे," असे हनुमंत पवार म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.