KCR and Pune : के. चंद्रशेखर रावांचा आता पुण्याकडे मोर्चा; लवकरच होणार जाहीर सभा

BRS Entry in Maharashtra : महाराष्ट्रात होणार 'बीआरएस'चा मुख्यमंत्री
K. Chandrashekhar Rao
K. Chandrashekhar RaoSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : महाराष्ट्रातील विधानसभेच्या सर्व २८८ मतदारसंघ पिंजून काढण्याचा चंग भारत राष्ट्र समितीने (बीआरएस) बांधला आहे. या सर्व ठिकाणी शेतकरी हितासाठी राबवलेल्या 'तेलंगणा पॅटर्न'चा प्रसार आणि प्रचार करण्यात येणार आहे. यासह बीआरएस शेतकऱ्यांचे संघटनही करत आहे. या संघटनेला मजबूत करण्यासाठी तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी ठिकठिकाणी सभा घेत आहेत. आता त्यांनी आपला मोर्चा पुण्याकडे वळविला आहे.

के. चंद्रशेखर राव यांची विक्रमी सभा पुण्यात (Pune) घेणार आहे. तसेच पुण्यात लवकरच एक एकरावर पक्षाचे भव्य कार्यालय उभारण्यात येणार आहे. याबाबत 'बीआरएस'च्या किसान पार्टीचे महाराष्ट्र अध्यक्ष माणिक कदम आणि पश्‍चिम महाराष्ट्र समन्वयक बी.जे. देशमुख यांनी दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी कदम म्हणाले, "आम्ही महाराष्ट्रात काम सुरू केल्यापासून एका महिन्यात १ लाख ८८ हजार सभासद नोंदणी झाली आहे. आमच्या पक्षाकडे शेतकऱ्यांचा येण्याचा वेग पाहता आम्ही लवकरच सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसह विधानसभा लोकसभा निवडणुकीत विजयी होऊ."

K. Chandrashekhar Rao
Kalyan-Dombivli News : खर्चाची तरतूद झाली नाही का? म्हात्रेंनी डिवचताच पाटलांनी टक्केवारीच काढली

देशमुख म्हणाले, "शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा देशाला लागलेला कलंक आहे. तेलंगणात मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekhar Rao) यांनी शेतकऱ्यांना अनेक सेवा उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे तेलंगणातील शेतकऱ्यांच्या ९९ टक्के आत्महत्या थांबल्या. या तेलंगणा पॅटर्नची देशाला गरज आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात विविध योजना राबवण्यासाठी बीआरएस सर्व मतदारसंघात काम करत आहे. महाराष्ट्रात लवकरच 'बीआरएस'चा मुख्यमंत्री असेल."

K. Chandrashekhar Rao
Chandrakant Khaire On Shirsat-Bhumre : शिरसाट बडबड करतो, भुमरेनी स्वतःचाच विकास केला..

के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात (Maharashtra) प्रवेश केला आहे. त्यांच्या बीआरएस पक्षात सर्व पक्षातील मोठ्या पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला आहे. यात काही माजी आमदारांचाही समावेश आहे. यासह मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणीही सुरू आहे.

दरम्यान, राव यांच्या नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर येथील सभा चांगल्याच गाजल्या आहेत. त्या दोन्ही सभांना शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी होती. त्या सभांतून राव यांनी 'अब की बार शेतकरी सरकार' असा नारा दिला आहे.

या पार्श्वभूमीवर आता लवकरच पुण्यातही राव यांची सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच पक्षाचे मोठे कार्यालयही उभारण्यात येणार असल्याचे 'बीआरएस'च्या कदम यांनी सांगितले.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com