Karmayogi Sugar Factory : कर्मयोगीच्या निवडणुकीतील पात्र उमेदवारांची यादी जाहीर; कोणत्या गटात किती उमेदवार? पाहा संपूर्ण यादी

Karmayogi Sugar Factory Election : कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२६-२७ ते २०३१-३२ या कालावधीसाठी संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी एकूण ५१ नामनिर्देशनपत्रे दाखल झाली होती. १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजल्यापासून अर्जांची छाननी करण्यात आली.
Karmayogi Sugar Factory Election
Karmayogi Sugar Factory Election Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune News, 22 Oct : इंदापूर तालुक्यातील महात्मा फुलेनगर येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्जांच्या छाननीवरून वाद निर्माण झाला आहे. छाननी प्रक्रिया एकतर्फी झाल्याचा आक्षेप काही विरोधी उमेदवारांनी घेतल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे, छाननीनंतर पात्र उमेदवारांची यादी जाहीर झाल्याने निवडणुकीतील पुढील घडामोडींकडे सभासदांचे लक्ष लागले आहे.

कारखान्याच्या सन २०२६-२७ ते २०३१-३२ या कालावधीसाठी संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी एकूण ५१ नामनिर्देशनपत्रे दाखल झाली होती. १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजल्यापासून अर्जांची छाननी करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने यांनी छाननीनंतर पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली.

ऊसपुरवठ्याच्या अटींवरून आक्षेप

सत्ताधारी पॅनेलविरोधात निवडणूक लढविणाऱ्या काही उमेदवारांनी छाननी प्रक्रियेवर आक्षेप घेतल्याचे समजते. संबंधित उमेदवारांनी सलग तीन वर्षे कारखान्याला ऊसपुरवठा केला आहे का, तसेच ऊसपुरवठ्याचे पेमेंट बँकेमार्फत झाले आहे का, या मुद्द्यांवरून हरकती घेण्यात आल्याची माहिती आहे.

उमेदवारीसाठी आवश्यक अटींची पूर्तता झाली आहे की नाही, यावरून काही अर्जांच्या पात्रतेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले. छाननी प्रक्रिया एकतर्फी झाल्याची भावना काही विरोधी उमेदवारांनी व्यक्त केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या आरोपांबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची अधिकृत भूमिका स्पष्ट झालेली नाही.

Karmayogi Sugar Factory Election
Sangli Bank Election : CM फडणवीसांचा फोन अन् 15 जागा बिनविरोध; जयंत पाटलांनी सांगितली सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीची 'इनसाईड स्टोरी'

कालठण, पळसदेवमध्ये सर्वाधिक उमेदवार

छाननीनंतर सर्वसाधारण प्रतिनिधी गटातील इंदापूर मतदारसंघात सात, कालठणमध्ये आठ, पळसदेवमध्ये आठ, भिगवणमध्ये चार, तर शेळगावमध्ये तीन उमेदवार पात्र ठरले आहेत. कालठण आणि पळसदेवमध्ये प्रत्येकी आठ उमेदवार असल्याने या मतदारसंघांत चुरस वाढण्याची शक्यता आहे.

महिला राखीव गटात तीन, इतर मागास प्रवर्गात दोन, भटक्या विमुक्त जाती-जमाती प्रवर्गात दोन, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गात एक, तर 'ब' वर्ग सहकारी उत्पादक, बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था प्रतिनिधी गटात दोन उमेदवार पात्र ठरले आहेत. कारखान्यावर पाटील घराण्याचे वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे हे वर्चस्व कायम राखण्यासाठी सत्ताधारी गटाकडून प्रयत्न होणार असून, विरोधक कोणती रणनीती आखतात, याकडे लक्ष असेल. अर्जांच्या छाननीनंतर आता उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या टप्प्यात कोण मैदानात कायम राहणार आणि कोण माघार घेणार, यावर निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.

कर्मयोगी कारखाना निवडणूक : गटनिहाय पात्र उमेदवारांची यादी

१. सर्वसाधारण प्रतिनिधी गट क्रमांक १ – इंदापूर (७ उमेदवार)

१. हिम्मत सुभेदार गायकवाड

२. पंडित मच्छिंद्र गुरगुडे

३. भास्कर सुभाष गुरगुडे

४. शांतिलाल दत्तात्रय शिंदे

५. राकेश रमेशप्रसाद शुक्ल

६. रविंद्र वामन सरडे

७. वामन पंढरीनाथ सरडे

२. सर्वसाधारण प्रतिनिधी गट क्रमांक २ – कालठण (८ उमेदवार)

१. दादाराम भगवान कांकणे

२. हनुमंत अंकुश जाधव

३. संपत विक्रम पवार

४. निलेश शामराव देवकर

५. हर्षवर्धन शहाजीराव पाटील

६. हरिश्चंद्र सदाशिव पारेकर

७. छगन धोंडीबा भोंगळे

८. अंकुश दत्तात्रय शहाणे

३. सर्वसाधारण प्रतिनिधी गट क्रमांक ३ – पळसदेव (८ उमेदवार)

१. लक्ष्मण कृष्णा करे

२. महेंद्र पांडुरंग काळे

३. संतोष लक्ष्मण काळे

४. प्रवीण यादवराव देवकर

५. राजेंद्रकुमार प्रतापराव देवकर

६. श्रीकांत शिवराव देवकर

७. राजवर्धन हर्षवर्धन पाटील

८. विजयकुमार काशिनाथ शिंदे

Karmayogi Sugar Factory Election
Gokul Election: गोकुळची सत्ता 'खिशात घेऊन फिरणाऱ्या' दोन दिग्गजांचा पराभव: अरुण डोंगळे, विश्वास पाटलांचं कुठं चुकलं?

४. सर्वसाधारण प्रतिनिधी गट क्रमांक ४ – भिगवण (४ उमेदवार)

१. विजय विठ्ठल खर्चे

२. पराग रमेशराव जाधव

३. प्रमिला रमेशराव जाधव

४. रणजित नामदेव निकम

५. सर्वसाधारण प्रतिनिधी गट क्रमांक ५ – शेळगाव (३ उमेदवार)

१. रोहित राजेंद्र गायकवाड

२. बिभीषण कल्याण नलवडे

३. अतुल शिवाजी शिंगाडे

राखीव प्रवर्गातील पात्र उमेदवार

६. इतर मागास प्रवर्ग (२ उमेदवार)

१. वसंत खंडू मोहोळकर

२. छगन धोंडीबा भोंगळे

७. भटक्या विमुक्त जाती व जमाती प्रवर्ग (२ उमेदवार)

१. हरिश्चंद्र सदाशिव पारेकर

२. हौरा शंकर पारेकर

८. महिला राखीव प्रतिनिधी गट (३ उमेदवार)

१. रत्नमाला संपत पवार

२. शारदा कुंभार पवार

३. सुमन नारायण अवहारे

९. अनुसूचित जाती-जमाती प्रवर्ग (१ उमेदवार)

१. अमोल सुभाष जाधव

१०. 'ब' वर्ग सहकारी उत्पादक, बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था प्रतिनिधी गट (२ उमेदवार)

१. हर्षवर्धन शहाजीराव पाटील

२. राजवर्धन हर्षवर्धन पाटील

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com