Kasba Peth : कसब्यात "मतदानाची शाई दाखवा.. मोफत चहा, पुस्तक मिळवा"

Kasba Peth Bypoll Election : 'मतदान करा आणि हातावर मेहेंदी काढून घ्या,' अशी देखील संकल्पना राबवली जात आहे.
Pune By-Election
Pune By-Election Sarkarnama
Published on
Updated on

Kasba Peth Bypoll Election : मतदान करण्यासाठी मतदारांनी घराबाहेर पडावे, यासाठी उमेदवारांचे समर्थक नेहमीच अनोखी शक्कल लढवत असतात, अशाच प्रकार आज पुण्यात पाहायला मिळाला. कसबा पेठ पोटनिवडणुकीत मतदारांना बाहेर काढण्यासाठी एका फोरमने हा अनोखा उपक्रम राबविला आहे.

या उपक्रमांची चर्चा पुण्यात आहे. "मतदानाची शाई दाखवा अन् चहा मोफत मिळवा", "मतदानाची शाई दाखवा अन् मोफत पुस्तक घ्या" अशी ऑफर यानिमित्ताने या फोरमने मतदारांना केली आहे. तर महिला मतदारांसाठी 'मतदान करा आणि हातावर मेहेंदी काढून घ्या,' अशी देखील संकल्पना राबवली जात आहे.

कसबा, चिंचवड विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीसाठीचे मतदान संथगतीने सुरु आहे. उमेदवारांचे कार्यकर्ते मतदारांना घराबाहेर काढत मतदान करण्याचे आवाहन करीत आहे. पण मतदारामध्ये निरुत्साह असल्याचे सध्याचे चित्र आहे. दुपारी एक वाजेपर्यंत चिंचवडमध्ये 20.68% तर कसब्यात केवळ 18.5% मतदान झाले आहे.

Pune By-Election
Kasba Peth Bypoll Election : नावे गायब, अनेक जण मतदानापासून वंचित ; यादीत मयतांची नावे..

काही ठिकाणी मतदार यादीत नाव नसल्याने मतदारांना मतदान करता आले नाही, तर काही मतदार याद्यांमध्ये मयतांची नावे आहेत. त्यांच्या नावावर बोगस मतदान होण्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली आहे. अनेकांना मतदानाचा अधिकार बजावण्यात आला नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे.

मतदार याद्या अद्यावत केल्याचे सांगत असताना अनेकांनी नावे गायब झाल्याचा प्रकार घडला आहे. दोन-तीन केंद्रांवर फिरून नाव आहे का याची चौकशी केली जात आहे. पण नाव सापडत नसल्याने नाईलाजाने मतदान न करता नागरिकांना घरी जावे लागले.

मतदार यादीतून नावे गायब होण्याच्या प्रकारामुळे हजारो मतदारांना गुरुवारी मतदानापासून वंचित राहावे लागले. नाव वगळण्यात आल्यामुळे झालेला मनस्ताप आणि भर उन्हात नाव शोधण्यासाठी करावी लागलेली वणवण यामुळे हजारो मतदारांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com