Prashant Kishor News : प्रशांत किशोर निवडणुकीच्या मैदानात? नरेंद्र मोदींच्या 'बाॅस'च्या होम ग्राऊंडवर देणार टक्कर...

Prashant Kishor Bankipur Assembly Byelection : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नतीन नवीन यांच्या होमग्राऊंडवर होत असलेल्या बांकीपूर मतदारसंघातून प्रशांत किशोर लढणार असल्याची चर्चा आहे.
Prashant Kishor
Prashant KishorSarkarnama
Published on
Updated on

Prashant Kishor News : गेल्या वर्षी झालेल्या बिहार विधानसभा निवडणूक झाली. या निवडणुकीत राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांची जनसुराज पार्टी देखील उतरली होती. मात्र, त्यांना एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. प्रशांत किशोर यांनी ही निवडणूक लढली नाही. ते उमेदवार नव्हते त्यामुळे पक्षाला फटका बसल्याची चर्चा होती. मात्र, आता बिहारमध्ये होत असलेल्या पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर हे उमेदवार असण्याची चर्चा सुरू झाली आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन हे राज्यसभेचे सदस्य झाले आहेत. ते बांकीपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार होते. मात्र, त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याने तेथे पोटनिवडणूक होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नितीन नवीन यांचा उल्लेख माझे बाॅस असा केला होता. त्यामुळे बाकीपूरच्या जागेवरील निवडणुकीला विशेष महत्त्व आले आहे.

नितीन नवीन परिवाराचे मागील 30 वर्षांपासून या विधानसभा मतदारसंघात वर्चस्व आहे. त्यामुळे त्यांना टक्कर देण्यासाठी जनसुराज पार्टीचे प्रमुख प्रशांत किशोर हे उमेदवार असतील अशी चर्चा आहे. जनसुराज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मनोज भारती यांनी सांगितले की, पक्षाने मागील एका महिन्यापासून बाकीपूर मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला आहे. मतदारसंघात भाजपविरोधात आक्रोश आहे. लोक सरकारला त्रस्त झाले आहेत. त्यामुळे लोकांकडूनच प्रशांत किशोर हे येथे उमेदवार असावेत, अशी मागणी होत आहे.

Prashant Kishor
MSRTC Action: ST प्रशासनाने उगारला शिस्तीचा बडगा! नाशिक विभागातील 11 अधिकारी निलंबित

पाच जुलैला जनसुराज पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक होत आहे. या बैठकीत प्रशांत किशोर यांच्या उमेदवारीबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. प्रशांत किशोर यांची उमेदवारी येथून निश्चित मानली जात आहे. मात्र, ते येथून लढणार की नाही याविषयी अधिकृत माहिती समोर आली नाही.

30 जुलैला होणार मतदान

निवडणूक आयोगाने बाकीपूर मतदारसंघातील पोटनिवडणुकीची घोषणा केली आहे. 13 जुलैपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. तर, 16 जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. दरम्यान, 30 जुलैला येथे मतदान होणार आहे.

Prashant Kishor
Ameet Satam BJP Controversy : मुंबईतील दोन मृत्यूनंतर भाजप अध्यक्षांची असंवेदनशीलता; अमित साटम यांना हसूच आवरेना, संदर्भ वेगळा असल्याचं स्पष्टीकरण

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com