मलिकांची भाषा धमकी देणारी, कुणीतरी त्यांना आवरा!

विधिज्ञ असीम सरोेदे यांचे राष्ट्रवादीच्या नेत्यांना आवाहन...
 Sameer Wankhede, Nawab Malik
Sameer Wankhede, Nawab Maliksarkarnama
Published on
Updated on

पुणे : अंमली पदार्थ प्रतिबंधक (NCB) मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर अल्पसंख्याक विकास मंत्री नबाव मलिक (Nawab Malik) यांनी हल्लाबोल केला होता. ‘सांगा त्या समीर वानखेडेला, तुझी नोकरी वर्षभरात जाईल. समीर वानखेडे हा बोगस, ह्याचा बाप बोगस, ह्याच्या घरातील लोक बोगस आहेत, अशा शब्दांत मलिक यांनी वानखेडे यांना इशारा दिला होता. त्यावर आता अनेकांकडून टीका होऊ लागली आहे.

पुण्यातील विधिज्ञ असीम सरोदे यांनी थेट राष्ट्रवादीच्या नेत्यांना आवाहन करत मलिकांना आवरण्याचा सल्ला दिला आहे. नबाब मलिक जी बडबड करीत आहेत, ती अत्यंत चुकीची आहे. त्यांची भाषा बेकायदेशीर कृत्यांना प्रोत्साहन देणारी आणि त्यांच्या राजकीय पदाचा वापर ते ' बदला घेण्यासाठी करतील' अशी स्पष्ट धमकी देणारी आहे, असं सरोदे यांनी फेसबूक पोस्टमध्ये म्हटले आहे.

 Sameer Wankhede, Nawab Malik
जसे चप्पल घालूनच बाहेर जातो, तसा मास्कचा वापर करा! पंतप्रधान मोदींचे आवाहन

केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर बदला घेण्यासाठी करणाऱ्या राजकीय नेत्यांमध्ये आणि तुमच्यामध्ये काय फरक आहे नबाब मलिक साहेब, असा सवालही सरोदे यांनी उपस्थित केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मधील कुणीतरी त्यांना समज दिली पाहिजे व अंमली पदार्थ, समीर वानखेडे या विषयावर बोलण्यास त्यांच्यावर त्यांच्या पक्षाने बंदी आणली पाहिजे, अशी मागणीही सरोदे यांनी केली आहे.

पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभाग कार्यकर्ता मेळाव्यामध्ये मलिक यांनी वानखेडे यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. समीर वानखेडे प्रसिद्धीसाठी लोकांना अडकवण्याचे काम करत आहे. हा वानखेडे भाजपवाल्यांचा म्होरक्या आहे. तो बोगसगिरी करतो, त्यामुळेच एनसीबी सध्या करत असलेल्या केसेस या बोगस आहेत. ह्या सर्व केसेस कोर्टात टिकणार नाहीत. आगामी काळात मी आणखी पुरावे सादर करणार आहे. या संदर्भात चालणारे तोडपाणी हे मालदीव आणि दुबईत चालते आहे, हे आम्हाला समजलंय, ही तोडपाणी थांबण्याचे काम मी करणार आहे, असे नवाब मलिक म्हणाले होते.

भाजपचे लोक ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स आदी संस्थांच्या माध्यमातून लोकांना भीती दाखवण्याचे काम करत आहेत. पण हा नवाब मलिक कुणाच्या बापाला भिणारा नाही. फडणवीस म्हणतात की राज्याचे अर्धे मंत्रिमंडळ तुरुंगात जाईल, माझं तर त्यांना आव्हान आहे की, त्यांनी आम्हाला तुरुंगात टाकावेच, असे आव्हानही मलिक यांनी फडणवीस यांना दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com