Hake vs Bhujbal : छगन भुजबळांचा 'तो' दावा लक्ष्मण हाकेंनी खोडला; आवाहन करत म्हणाले, 'आमनेसामने बसा पुराव्यानिशी...'

OBC Reservation Morcha: ओबीसी आरक्षणाला धक्का लागला नसल्याचा दावा मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्याला लक्ष्मण हाके यांनी आव्हान देत थेट पुरावे सादर करण्याची तयारी दाखवली आहे.
Laxman Hake- Chhagan Bhujbal
Laxman Hake- Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

OBC Reservation : ओबीसीमध्ये मराठा समाजाची घुसखोरी होत आहे, असा आरोप केला जात होता. लक्ष्मण हाकेंनी केलेल्या या आरोपाबाबत बोलताना ओबीसी नेते, मंत्री छगन भुजबळ म्हणाले होते की, ओबीसींच आरक्षण काही संपलेलं नाही.

भुजबळांच्या वक्तव्यानंतर लक्ष्मण हाके यांनी थेट त्यांना समोरसमोर बसण्याचे आवाहन केले आहे. हाके म्हणाले, 'भुजबळसाहेब आमचे नेते आहेत, मात्र त्यांना एक प्रश्न विचारतो, महाराष्ट्रात 22 लाख कुणबी प्रमाणपत्रे वाटल्याचा दावा आहे.

'एवढ्या मोठ्या संख्येने मराठा समाज ओबीसीमध्ये आल्यास मूळ ओबीसी समाज स्पर्धेत टिकेल का? त्यांनी आमने-सामने बसावं, पुराव्यानिशी सरकारला आरक्षणाची सद्यस्थिती दाखवून देऊ.', असे आवाहन देखील हाके यांनी केले.

27 टक्के आरक्षण मूळ ओबीसींसाठी आहे.मोठ्या संख्येने मराठा समाज ओबीसीमध्ये समाविष्ट झाल्यास मूळ ओबीसी स्पर्धेत टिकेल का? ओबीसींना आरक्षणाचा लाभ मिळणार नसेल तर हे आरक्षण काय कामाचं?'' असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

ओबीसी नेत्यांमध्ये फूट?

भुजबळ मंत्री असल्याने त्यांच्यावर सत्ताधाऱ्यांची भूमिका घेण्याचा दबाव आहे का? असा सवाल देखील हाके यांनी उपस्थित केला. भुजबळांचा ओबीसी मोर्चाला पाठींबा नसल्याची चर्चा होती. त्यातच 1 सप्टेंबरला भटक्या-विमुक्त आणि ओबीसींचा मोर्चा मुंबईच्या दिशेने जाणार, असे हाके म्हणाले. त्यामुळे ओबीसी नेत्यांमध्ये फूट पडल्याची चर्चा आहे.

Laxman Hake- Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal : भुजबळांकडून PM मोदींसह केंद्र सरकारच्या अभिनंदनाचा ठराव, भर बैठकीत का मानले आभार?

सरकारवर निशाणा

मंत्री उदय सामंत हे लक्ष्मण हाकेंना भेटणार असल्याचे सांगितले जात होते. त्यावर बोलताना ते म्हणाले, “उद्योगमंत्र्यांनी आम्हाला भेटावं, अशी आमची अपेक्षा नाही. सरकारच्या निर्णयामुळे महाराष्ट्रात 22 लाख कुणबी प्रमाणपत्रे वाटल्याचा दावा आहे. या स्पर्धेत मूळ ओबीसींचे काय झालं, हे सरकारने सांगावं. सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या ओबीसींच्या स्थानिक प्रतिनिधित्वावर परिणाम झाला आहे का?' असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

Laxman Hake- Chhagan Bhujbal
Laxman Hake News: ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची पुन्हा छगन भुजबळांवर टीका? व्हायरल झालेला व्हिडीओ खरा की खोटा? पहिली प्रतिक्रिया समोर

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com