Laxman Hake News: ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची पुन्हा छगन भुजबळांवर टीका? व्हायरल झालेला व्हिडीओ खरा की खोटा? पहिली प्रतिक्रिया समोर

OBC Leader Laxman Hake Viral Video: राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पेटल्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे त्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिका आणि आंदोलनामुळे राज्यभरात चर्चेत आले होते. याच हाकेंचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
Laxman Hake- Chhagan Bhujbal
Laxman Hake- Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Pune News: राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पेटल्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे त्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिका आणि आंदोलनामुळे राज्यभरात चर्चेत आले होते.मराठा आरक्षणासाठी मोठा लढा उभारलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीस तीव्र विरोध करण्याची हाके एकही संधी सोडताना दिसून येत नाही. याच हाकेंचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत त्यांनी एका बड्या नेत्यावर शा‍ब्दिक हल्ला चढवला असल्याचं दिसून येत आहे. या व्हिडीओत ते ‘हा मुख्यमंत्र्यांना दोन उपमुख्यमंत्र्यांना भेटायला गेलाय.घेऊन कोणाला गेलाय,स्वत:,स्वत:चा मुलगा, आणि स्वत:चा पुतण्या. हे तिघेजण गेले आणि सभेत सांगत आहे की, ते तिघेजण होते आणि आम्ही तिघेजण होतो. मला लय ते वाक्य खटकलं होतं,पण जाऊदे म्हटलं,आपल्याला सॉफ्ट कॉर्नर फक्त. ’असंही व्हिडीओत हाके बोलताना दिसून येत आहे.

त्या बड्या नेत्याची आपल्यामागं फरपट होत असल्याचा दावाही हाके यांनी व्हायरल व्हिडीओत करताना दिसून येत आहे. त्याचं कसं आहे त्यांच्याकडे आहे यंत्रणा, त्याच्याकडे आहे संघटन. मीडिया हँडल करणं, मोठा स्टेज डेकोरम देणं, मीडियाला प्रॉपर बातमी देणं, याही बाबींवर बोट ठेवत हाकेंनी नेमकं कोणत्या बड्या नेत्यावर निशाणा साधला आहे, याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

आंदोलन करायचं नाही,मी दुसऱ्या दिवशी जाहीर केलं. मात्र, महाराष्ट्रातल्या लोकांनी सरकारचा जीआर फाडावा,त्याची होळी करावी,रस्त्यावर उतरावं, निवेदनं द्यावीत. पण हा बोलला होता ना, काय करायचं नाही म्हणून.माझ्या उपस्थितीत म्हणला होता की, आंदोलन थांबवा,स्टेजवरच होतो ना, मी पण.’ असा गंभीर आरोप करत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी खळबळ उडवून दिली आहे.

Laxman Hake- Chhagan Bhujbal
Ashok Kharat Crime: अशोक खरातचे केबिनमधील व्हिडीओ 21 राज्यांसह परदेशापर्यंत पोहोचले, क्लिप विक्रीचं रॅकेट? तपासात धक्कादायक खुलासा

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओवर लक्ष्मण हाके यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ते म्हणाले, हा कोणता व्हिडिओ आहे,कधीचा आहे, तो पूर्ण का दाखवला जात नाही? असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला. यापूर्वीही हाकेंनी छगन भुजबळांवर कडाडून टीका केली होती. हाकेंना धक्का देत बीडमधील भुजबळांच्या उपस्थितीतील ओबीसी एल्गार सभेच्या बॅनरवरुन त्यांना वगळण्यात आलं होतं.

हाके म्हणाले, मी ओबीसींच्या प्रश्नावर भांडत आहे,लढत आहे,रात्रंदिवस पळत आहे. त्यावर कोणी बोलत नाही. अशा गोष्टींमधून काय साध्य करायचं आहे? ओबीसींच्या प्रश्नावर कोणीही बोलायला तयार नाही. या लोकांचा उद्देश लक्ष्मण हाकेला डॅमेज करणं हा आहे.पण हाके डॅमेज होणाऱ्यातला नसल्याचा पलटवारही त्यांनी यावेळी विरोधकांवर केला.तसेच आपण यापुढेही बोलायचं थांबवणार नसल्याचा इशाराही

Laxman Hake- Chhagan Bhujbal
Congress Crisis : आठवडा होत नाही तोच शिवकुमार सरकारला दुसरा धक्का? 'खाते नाही तर पदभारही नको' मंत्र्याच्या भूमिकेने खळबळ

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com