Abhaysingh Jagtap News : अभयसिंह जगताप माढ्याचं टेन्शन वाढवणार, वंचित की स्वाभिमानीतून लढणार?

Madha Lok Sabha Election 2024 : शरद पवारांच्या भेटीनंतरही अभयसिंह जगताप लोकसभा निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत.
Abhaysingh Jagtap
Abhaysingh Jagtapsarkarnama
Published on
Updated on

Pune News : गेल्या काही दिवसांपासून माढा लोकसभा मतदारसंघ ( Lok Sabha Election Constituency ) महाराष्ट्रात चर्चेत आला आहे. भाजपनं रणजितसिंह नाईक-निंबाळकर ( Ranjisingh Naik Nimbalkar ) यांना उमेदवारी जाहीर केल्यावर मोहिते-पाटील कुटुंबीयाने नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर रविवारी ( 14 एप्रिल ) मोहिते-पाटील यांनी 'तुतारी' हाती घेतली आहे. पण, मोहिते-पाटलांचा राष्ट्रवादीत प्रवेश होताच माढ्यातून इच्छुक असलेले अभयसिंह जगताप ( Abhaysingh Jagtap ) बंड पुकारण्याच्या तयारीत आहेत. वंचित बहुजन आघाडी किंवा स्वाभिमानीतून लढण्यास तयार असल्याचं जगतापांनी सांगितलं.

माढा लोकसभा मतदारसंघातून लढण्यासाठी अभयसिंह जगताप ( Abhaysingh Jagtap ) इच्छुक होते. पण, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( Jayant Patil ) यांनी धैर्यशील मोहिते-पाटील ( Dhairyashil Mohite Patil ) यांच्या उमेदवारीची घोषणा केली. यानंतर नाराज झालेल्या अभयसिंह जगताप यांनी पुण्यातील 'मोदीबाग' या निवासस्थानी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांची भेट घेतली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अभयसिंह जगताप म्हणाले, "शरद पवार आणि जयंत पाटील यांची भेट घेऊन मला समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. मी माझ्या पद्धतीनं शरद पवारांशी चर्चा केली असून, लवकरच तोडगा निघेल, असं मला वाटतं. मी माझी काही स्वप्ने घेऊन माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होतो."

Abhaysingh Jagtap
Dhairyasheel Mohite Patil join NCP : एका रात्रीत आमदार केलेलं पार्सल पुन्हा एका रात्रीत बीडला माघारी पाठवू’ ; मोहिते पाटलांचा सातपुतेंवर हल्लाबोल

"मला जर समाधानकारक उत्तर मिळालं, तरच मी पक्षातील उमेदवाराचे काम करेल, अन्यथा मी इच्छुक असल्यानं कोणाचंही काम करणार नाही. माढा लोकसभा मदारसंघासाठी माझं काय व्हिजन आहे, माझे काय स्वप्न आहे, याची पूर्ण माहिती शरद पवार यांनी माझ्याकडून घेतली. मी स्वत: अपक्ष, वंचित बहुजन आघाडी किंवा राजू शेट्टी यांच्या पाठिंब्यावरती निवडणूक लढविण्यास तयार आहे," असं जगतापांनी स्पष्ट केलं.

R

Abhaysingh Jagtap
Vijaysinh Mohite–Patill : विजयसिंह मोहिते पाटील अस्सल सोनं, पण...; जयंत पाटलांनी भाजपला फटकारलं

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com