Dilip Mohite Patil, Amol Kolhe
Dilip Mohite Patil, Amol Kolhesarkarnama

Loksabha Election 2024 : हा गद्दार, तो गद्दार.! म्हणणारे कोल्हे महागद्दार : दिलीप मोहिते पाटील यांची टीका

Dilip Mohite Patil खेड तालुक्यातील डेहेणे येथे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचार सभेत दिलीप मोहिते पाटील बोलत होते.

Shirur loksabha News : हा गद्दार, तो गद्दार म्हणणारे अमोल कोल्हे हे मात्र महागद्दार आहेत, असे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी अमोल कोल्हेंवर हल्लाबोल करत शरद पवारांनाही थेट जाब विचारत मनातील खदखद व्यक्त केली.

खेड तालुक्यातील डेहेणे येथे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचार सभेत दिलीप मोहिते पाटील बोलत होते. दिलीप मोहिते पाटील म्हणाले, आम्हीही शरद पवारांना मानतो. त्यांच्याशी आमचे वैरत्व नाही.

मात्र, अपेक्षा होती केंद्राची सत्ता आणि कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी कायदा करून ठेवला असता तर कांदा आणि दुधाचा प्रश्न मार्गी लागले असते, असा थेट सवाल मोहिते पाटील यांनी शरद पवारांना केला. या वेळी मोहिते पाटीलांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली.

.(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Dilip Mohite Patil, Amol Kolhe
Shirur Lok Sabha Constituency : शिरुर मतदारसंघातील 'या' उमेदवाराचं नाराज मतदारांनी हटके बॅनर लावून केलं स्वागत!

दिलीप मोहिते पाटील यांनी थेट खासदार शरद पवार यांच्यावरच निशाणा साधल्यामुळे आता डॉ. अमोल कोल्हे त्यांना काय प्रतित्युत्तर देणार याची उत्सुकता आहे. सध्या शिरूर लोकसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Edited By : Umesh Bambare

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com