Pune News : वेताळ टेकडीचे भूत राजकीय पटलावरून उतरेना, रस्त्यावरून भाजपत सुरू असलेल्या वादात ठाकरे गटाची उडी

Balbharati Paud Phata Road News : पौड फाटा रस्त्याला पर्यावरणप्रेमींनी जोरदार विरोध दर्शवला होता. आता लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा हा वाद उफाळला आहे.
bjp vs shivsena ubt
bjp vs shivsena ubtsarkarnama

Pune Bjp News, 18 May : पुणे लोकसभा निवडणुकीचे ( Pune Lok Sabha Election 2024 ) मतदान पार पडतात बालभारती पौड रस्त्यावरून पुन्हा एकदा राजकारण सुरू झालं आहे. भाजपमधील दोन नेत्यांमध्ये सुरू असलेल्या वादात आता शिवसेना ठाकरे गटाने देखील उडी घेत सडकून टीका केली आहे. त्यामुळे बालभारती पौड रस्ता आणि वेताळ टेकडीचे भूत काय राजकीय पटलावरून उतरताना दिसत नाही.

मतदान पदरात पाडून घेण्यासाठी भाजपा ( bjp ) किती खालच्या थराला जाते, अशी टीका शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षाचे शहरप्रमुख गजानन थरकुडे यांनी ट्वीट करत केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गजनन थरकुडे म्हणाले, "मोजक्या लोकांच्या फायद्यासाठी भाजपने वेताळ टेकडीवर रस्ता करण्याचा घाट घातला होता. मतदारांनी विरोध दर्शवल्यानंतर भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी समंजस्य भूमिका घेत असल्याचे सांगत स्थानिकांची मते पदरात पाडून घेतली. निवडणूक संपताच पुन्हा एकदा हुकूमशाही प्रवृत्ती दाखवत त्यांनी 'डंके की चोट पर' हा रस्ता करून दाखविणार आहे. मतदान पदरात पाडून घेण्यासाठी भाजपा किती खालच्या थराला जाते हे यावरून स्पष्ट होत आहे."

"वेताळ टेकडी फोडून बालभारती ते पौड फाटा हा रस्ता करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. मात्र, भाजपाच्या नेत्यांनी केवळ निवडणुकीपुरता या विषयावर पडदा टाकला. निवडणूक होताच पुन्हा रस्ता करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भविष्यात भाजपाने हा रस्ता करण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्या विरोधात विरोधात तीव्र आंदोलन करू," असा इशाराही थरकुडे यांनी दिला.

bjp vs shivsena ubt
Pune BJP : लोकसभेच्या मतदानानंतर बालभारती ते पौड फाटा रस्त्यावरून वाद पेटला; भाजप नेत्यांत नेमकं काय झालं?

"भाजपने मागील पाच वर्षांत महानगरपालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला. कोरोना काळात भाजपच्या अनेक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी महापालिकेचा, राज्याचा आणि केंद्राचा पैसा आपल्या खिशात घातला. मेट्रो प्रकल्प केंद्र आणि राज्य सरकार यांनी मिळून केला. मात्र, भाजपचे स्थानिक पदाधिकारी याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहेत. चांदणी चौक हा तांत्रिकदृष्ट्या बारामती लोकसभा मतदारसंघात येतो. यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनीही प्रयत्न केले होते. त्यामुळे दुसऱ्यांनी केलेल्या कामांचे श्रेय लाटण्याचे काम भाजपकडून केले जात आहे," अशी टीकाही थरकुडे यांनी केली.


( Edited By : Akshay Sabale )

bjp vs shivsena ubt
Loksabha Election 2024 : हलगर्जीपणा नडला आणि टक्का घटला;....यामुळे कमी झाले पुण्याचे मतदान

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com