Shiv Sangram News: 'शिवसंग्राम' मैदानात; लोकसभेच्या तीन, तर विधानसभेच्या 12 जागा लढवणार ?

Lok Sabha Elections 2024: शिवसंग्राम पक्ष बीड विधानसभादेखील लढविण्याच्या तयारीत...
Shiv Sangram
Shiv SangramSarkarnama
Published on
Updated on

Pune News : महायुतीत सहभागी झालेल्या घटक पक्षांची संख्या चारवरून आता 11 झाली असून सत्तेत केवळ तीनच पक्ष आहेत. उर्वरित घटक पक्षांकडे मात्र दुर्लक्ष होत आहे, याकडे भाजपने लक्ष दिले पाहिजे, अशी अपेक्षा शिवसंग्राम संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली.

भारतीय जनता पक्षाशी एकनिष्ठ अशी शिवसंग्रामची सुरुवातीपासून भूमिका राहिली असून आजही आम्ही भाजपसोबत आहोत, असे शिवसंग्राम संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे यांनी सांगितले. गेल्या विधानसभा निवडणुकीत आम्ही भाजप बरोबर निवडणूक लढविली होती.

त्यावेळी आमचे दोन उमेदवार विजयी झाले होते. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसंग्राम संघटनेने तीन जागा लढविण्याचा निश्चय केला असून या जागा नक्की कोणत्या असतील त्याची माहिती आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर दिली जाईल.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Shiv Sangram
Shiv Sangram News: 'शिवसंग्राम' महायुतीतून बाहेर पडण्याच्या मार्गावर?

तळागाळातील माणसांपर्यंत शिवसंग्राम संघटना पोहोचली असून गेल्या काही वर्षांमध्ये सामाजिक संघटना म्हणून कामे मार्गी लावली आहेत. आगामी लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय शिवसंग्रामने घेतला असून यासाठी भाजपबरोबर चर्चा केली जाणार आहे. त्यानंतर या जागा कोणत्या असतील,त्यावर शिक्कामोर्तब होईल.

लोकसभेबरोबरच विधानसभेच्या जागादेखील आम्ही लढवणार असून बीड विधानसभा बरोरबरच 12 जागा लढविण्याची तयारी आमची असल्याचे संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शिंदे यांनी सांगितले. गेल्या निवडणुकीपेक्षा यंदाच्या निवडणुकीत जादा जागा लढणार आहे.

महायुतीत सहभागी असलेल्या घटक पक्षांनादेखील त्यांच्या ताकदीनुसार पदे, विविध महामंडळे यावर प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली पाहिजे, अशी अपेक्षादेखील त्यांनी व्यक्त केली. शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक दिवंगत आमदार विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे बीड विधानसभेची जागा लढविणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

(Edited By- Ganesh Thombare)

Shiv Sangram
Sadabhau Khot : सदाभाऊंनी वाढवलं धैर्यशील मानेंचं टेन्शन; हातकणंगलेच्या जागेवर केला दावा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com