Narendra Modi : मोदींनी घेतला लोकसभेपासून धडा? पुण्यातील सभेत शरद पवारांवर एक शब्दही बोलले नाहीत

Assembly Election Narendra Modi Pune Rally : पुण्यातील सभेला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.त्यामुळे त्यांच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी शरद पवारांवर टीका करणार का ?असा प्रश्न उपस्थित केला जात होता.
Sharad Pawar, Narendra Modi
Sharad Pawar, Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुणे जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांसाठी एस पी कॉलेज येथे सभा पार पडली. गेल्या काही वर्षांमध्ये मोदींनी पुण्यामध्ये घेतलेल्या सभांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे या सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा शरद पवारांना लक्ष करणार का ? याची उत्सुकता होती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर निशाणा साधला मात्र शरद पवारांवर बोलणं टाळलं.

पुण्यातील सभेला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.त्यामुळे त्यांच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी शरद पवारांवर टीका करणार का ?असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र संपूर्ण सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांना निशाणा केल्याचे पाहायला मिळालं मात्र त्यांनी शरद पवारांवर कोणतीही टीका करणे टाळले. त्यामुळे अजितदादांनी सुटकेचा निश्वास टाकल्याची चर्चा राजकीय वर्तुळ रंगली आहे.

Sharad Pawar, Narendra Modi
Amit Shah : अमित शाहांचं सर्वात धक्कादायक विधान, म्हणाले, महायुती सरकार नसतं,तर मुंबई राहण्यासारखी राहिली नसती!'

मोदी म्हणाले, काँग्रेस आणि त्यांच्यासारख्या पक्षांनी नेहमीच महाराष्ट्राचा अपमान केला आहे. ही धरती छत्रपती शिवाजी महाराजांची धरती आहे. काँग्रेस आणि त्याचे मित्रपक्ष हे औरंगजेबच्या गोष्टी करतात. वीर सावरकरांची निंदा करतात. आघाडी सरकारला माझे चॅलेंज आहे. जर तुमच्या दम असेल तर वीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांचं कौतुक राहुल गांधी यांना करायला सांगा. काँग्रेस अशी पार्टी आहे ज्यांच्याकडे नियत, नीती आणि नैतिकता अशी कोणतीच गोष्ट नाही. फक्त त्यांना सत्ता हवी आहे, असे टीका मोदींनी केली.

काँग्रेसने सत्तेसाठी देशाला फक्त तोडण्याचं काम केलं आहे. आता तीच काँग्रेस सत्तेसाठी दलित, मागासवर्गीय आणि आदिवासींना तोडण्याचं आणि विभागण्याचं खेळ करत आहे. एससी, एसटी आणि ओबीसीला वेगवेगळ्या जातीमध्ये वाटून त्यांची एकी तोडण्याचा प्रयत्न करत आहे.

काँग्रेस एससी एसटी आणि ओबीसी च वेगवेगळ्या जातींना भिडवण्याचं काम करत आहे. त्यातून या जातींना कमजोर करून त्यांच्या आरक्षण काढून घेण्याचा डाव काँग्रेस असल्याचा आरोप मोदींनी केला. त्यामुळे आपण एक राहू तरच सेफ राहू असा नारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला.

लोकसभेपासून धडा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्यावर भटकती आत्मा अशी टीका केली होती. त्यामुळे लोकसभेला भाजपला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला भटका बसल्याचे विश्वेषण केले जात होते. त्यामुळे पुण्यात होणाऱ्या सभेत मोदी शरद पवारांवर काय बोलणार याची उत्सुकता होती. मात्र, लोकसभेपासून धडा घेत मोदींनी शरद पवारांवर टीका करण्याचे टाळले.

Sharad Pawar, Narendra Modi
Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून पुण्याचे गुणगाण, सांगितलं खास नातं

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com