BJP Pune: पुण्याच्या वाट्याला कॅबिनेट अन् राज्यमंत्रिपद? दोन नेत्यांना पक्षश्रेष्ठींकडून फोन

Maharashtra Cabinet Expansion BJP Miniters Got Call From Party: पर्वती विधानसभा मतदारसंघातून माधुरी मिसाळ आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघातून भीमराव तापकीर हे चौथ्यांदा निवडणूक जिंकले आहेत. दोन्ही सीनियर नेते असले तरी अद्याप त्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडलेली नव्हती.

maharashtra cabinet expansion
maharashtra cabinet expansion Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : विधानसभा निवडणुकीनंतर आता आज नागपूरमध्ये मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. भाजपाला 22 शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेला 12 तर अजित दादांच्या राष्ट्रवादीला 9 मंत्रिपद मिळणार असल्याचे सांगितलं जात आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या नव्या मंत्रिमंडळात जुन्या आणि नव्या नेत्यांचा समतोल साधला गेला असल्याचे पाहायला मिळत आहे. पुण्यातून देखील एक जुन्या नेत्याला तर एक नवीन नेत्याला मंत्रिपदाची संधी देण्यात येणार आहे. या दोन्ही नेत्यांना आज सकाळीच मंत्रिपद स्वीकारण्यासाठी तयार राहण्याबाबत फोन आले आहेत.

संभाव्य मंत्र्यांना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून आज सकाळपासूनच फोन करण्यात येत आहेत. बहुतांश नेते उद्यापासून सुरू होणाऱ्या नागपूर अधिवेशनासाठी नागपूर मध्ये दाखल झाले आहेत. काही नेते प्रवासात आहेत. अशातच आज सकाळी सकाळी अनेक नेत्यांना आज मंत्रिपद स्वीकारण्यासाठी तयार राहण्याच्या सूचना देण्यात आले आहेत.


maharashtra cabinet expansion
Devendra Fadnavis: लाडक्या बहिणींची रांगोळी, घरांवर विशेष रोषणाई ; धरमपेठ परिसरात आज साजरी होणार 'देव दिवाळी' VIDEO पाहा

काही नेत्यांना फोन करून सूचना देण्यात आले असल्या तरी अनेक नेते अद्याप आपल्याला फोन आलेला नसल्याचे सांगत आहे. त्यामुळे अनेक नेते आपल्या नेत्यांकडून येणाऱ्या फोनच्या प्रतीक्षेत आहेत.

पुणे जिल्ह्यामध्ये महायुतीचे घटक पक्ष असलेले २१ पैकी १९ आमदार आहेत. त्यामुळे भाजप अजित पवार गट आणि शिंदे गट या तीनही पक्षांकडून प्रत्येकी एक मंत्रिपद मिळेल, अशी चर्चा आहे. भाजपकडून शहरात मंत्री आणि जिल्ह्यामध्ये एखादे राज्यमंत्रिपद दिले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


maharashtra cabinet expansion
Maharashtra Cabinet Extension : विखेंचा मंत्रिमंडळात समावेश निश्चितच; महसूल खाते कायम राहणार का?

सध्या भाजपाकडून चंद्रकांत पाटील यांना फोन आला आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातून चंद्रकांत पाटील त्यांच्या वाट्याला कॅबिनेट मंत्रीपद येईल हे जवळपास निश्चित मानले जात आहे. सोबतच पर्वती विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार माधुरी मिसाळ यांना देखील भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी फोन केला आहे. त्यामुळे त्यांच्या गळ्यामध्ये राज्यमंत्रीपदाची माळ पडण्याची शक्यता आहे.

पर्वती विधानसभा मतदारसंघातून माधुरी मिसाळ आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघातून भीमराव तापकीर हे चौथ्यांदा निवडणूक जिंकले आहेत. दोन्ही सीनियर नेते असले तरी अद्याप त्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडलेली नव्हती.

आता माधुरी मिसाळ यांना संधी मिळाल्याने भीमराव तापकीर यांच्याबाबत पक्ष काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यासोबतच तर सिद्धार्थ शिरोळे आणि सुनील कांबळे हे दुसऱ्यांदा आमदार झाले आहेत.

पुणे जिल्ह्यातून राहुल कुल तर पिंपरी चिंचवड मधून महेश लांडगे हे देखील राज्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये होते. मात्र यातील कोणत्याही नेत्याला अद्याप फोन आलेला नाही. त्यामुळे हे सर्व नेते वरिष्ठांच्या फोनच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र सध्या तरी पुणे शहरातून भाजपच्या कोट्यातून एक कॅबिनेट मंत्री तर एक राज्यमंत्री शहराला मिळणार असल्याचं जवळपास निश्चित मानले जात आहे.

नितेश राणे आणि शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना मंत्रिपदासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांनी फोन केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच भाजपाच्या सर्वात श्रीमंत आमदारांपैकी एक असलेले आणि पर्यटनमंत्री म्हणून यापूर्वी मंत्रिमंडळात समावेश असलेल्या मंगलप्रभात लोढांनाही मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी फोन आला आहे. त्याचप्रमाणे गणेश नाईकांनाही मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी पक्षाकडून संपर्क साधण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com