Maharashtra education department : शाळांच्या गुणवत्तेवर आता वरिष्ठांची नजर; अधिकारी थेट शाळेत जाऊन घेणार ‘ग्राउंड रिपोर्ट’

Maharashtra education department News : शिक्षण विभागाने ‘चला शाळेत जाऊया’ अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील शाळांच्या प्रत्यक्ष पाहणीचा कार्यक्रम हाती घेतला आहे.
Private School (AI Image)
Private School (AI Image)Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळतेय का, मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत का, तसेच शैक्षणिक व प्रशासकीय कामकाजाची स्थिती नेमकी काय आहे, याचा आता वरिष्ठ अधिकारी थेट शाळेत जाऊन आढावा घेणार आहेत. शिक्षण विभागाने ‘चला शाळेत जाऊया’ अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील शाळांच्या प्रत्यक्ष पाहणीचा कार्यक्रम हाती घेतला आहे.

या अभियानांतर्गत जिल्हानिहाय नियुक्त करण्यात आलेले नोडल अधिकारी सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये तीन टप्प्यांत जिल्ह्यांना भेटी देणार आहेत. केवळ कार्यालयीन अहवालांवर अवलंबून न राहता शाळेतील प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेण्यावर या पाहणीचा भर राहणार आहे.

शालेय शिक्षण विभागाने शैक्षणिक कामकाजाच्या सनियंत्रणासाठी जिल्हानिहाय नोडल अधिकारी, तसेच विभागनिहाय सनियंत्रण अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. नोडल अधिकाऱ्यांनी केवळ कार्यालयीन कामकाजाचा आढावा न घेता जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्थेचा सर्वंकष आढावा घ्यावा, अशा सूचना शिक्षण आयुक्तांनी दिल्या आहेत.

Private School (AI Image)
Maharashtra Political Live Update : 'कुंभमेळ्यावर 30 हजार कोटी खर्च होतात; त्यातून किती शाळा किंवा IIT उभारता आल्या असत्या..?';इम्तियाज जलील

पाणी, स्वच्छतागृहांपासून गुणवत्तेपर्यंत तपासणी

नोडल अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष शाळा भेटीत पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्वच्छतागृहे, वर्गखोल्यांची दुरुस्ती, नवीन वर्गखोल्या, शाळा परिसराची स्वच्छता, क्रीडांगण, कुंपण, वीज, फर्निचर, ई-सुविधा, गणवेश आणि पोषण आहाराचा पुरवठा यांचा आढावा घेतला जाणार आहे. त्याचबरोबर शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीचे सक्षमीकरण, विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि विविध शैक्षणिक उपक्रमांची अंमलबजावणी यावरही लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

Private School (AI Image)
Latur Teacher Recruitment Scam: एसआयटीचे पाऊल पडताच लातूरच्या शिक्षण विभागात हायव्होल्टेज ड्रामा; रात्रीतून दीड हजार फायली हलवल्या, धाकधूक वाढली!

‘अहवाल’ नव्हे, प्रत्यक्ष परिस्थितीचा पंचनामा

शाळांना लोकसहभागातून आणि सामाजिक दायित्व निधीतून सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नोडल अधिकारी प्रयत्न करणार आहेत. प्रत्येक भेटीत गेल्या सूचनांची पूर्तता झाली आहे की नाही, याचीही तपासणी केली जाणार आहे. 5 सप्टेंबर ते 20 ऑक्टोबर या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार असून, पहिल्या दिवशी तालुक्यातील किमान दोन शाळांना भेट देऊन तेथील शैक्षणिक गुणवत्ता आणि पायाभूत सुविधांची पाहणी केली जाणार आहे.

Private School (AI Image)
Teacher Recruitment Scam : बोगस शिक्षक प्रकरणात महाराष्ट्रातील 5 जिल्हे रडारवर : 6 वर्षांत रुजू झालेल्यांची होणार SIT चौकशी

राज्यातील 177 तालुक्यांची विस्तारित आकांक्षित तालुके म्हणून निवड करण्यात आली असून, जिल्हा भेटीदरम्यान संबंधित तालुक्यांना प्राधान्य देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या पाहणीमुळे शाळांमधील प्रत्यक्ष परिस्थिती वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर येणार असून, कागदोपत्री गुणांकनापेक्षा प्रत्यक्ष शैक्षणिक गुणवत्ता आणि सुविधांची स्थिती किती आहे, हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com