Professor Recruitment 2026 : प्राध्यापक व्हायचं स्वप्न आता होणार पूर्ण! राज्य सरकारचा मोठा निर्णय; तब्बल 5500 पदांसाठी भरतीची तयारी सुरू

Maharashtra government professor recruitment : महाराष्ट्र सरकारकडून 5500 प्राध्यापक पदांसाठी मोठी भरती जाहीर. इच्छुक उमेदवारांसाठी ही मोठी संधी.
Professor Recruitment 2026 : प्राध्यापक व्हायचं स्वप्न आता होणार पूर्ण! राज्य सरकारचा मोठा निर्णय; तब्बल 5500 पदांसाठी भरतीची तयारी सुरू
Published on
Updated on

Pune News : राज्यातील विविध विद्यापीठे व संलग्न महाविद्यालयांमधील प्राध्यापकांच्या रिक्त जागा भरण्यास शासनाने मंजुरी दिली असून, ग्रंथपाल व शारीरिक शिक्षण संचालक या पदांच्या रिक्त जागाही भरण्यात येणार आहेत. या संदर्भातील परिपत्रक पुणे विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाने काढले आहे.

यामुळे महाविद्यालयांतील सहाय्यक प्राध्यापकांच्या पदांसोबतच शिक्षण संस्थांना ग्रंथपाल व शारीरिक शिक्षण संचालक या दोन्ही पदांची रोस्टर तपासणी करावी लागणार आहे.

Professor Recruitment 2026 : प्राध्यापक व्हायचं स्वप्न आता होणार पूर्ण! राज्य सरकारचा मोठा निर्णय; तब्बल 5500 पदांसाठी भरतीची तयारी सुरू
Ashok Kharat Lates Update : अशोक खरातच्या मोबाईलमध्ये 'पापांचा' डोंगर? व्हॉईस नोट्स अन् चॅटमध्ये दडलंय काय? समोर आलं हादरवून टाकणारं वास्तव!

राज्य शासनाने उच्च शिक्षण संचालनालयाच्या नियंत्रणाखालील मान्यताप्राप्त अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील सहाय्यक प्राध्यापकांच्या रिक्त पदांची भरती करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे राज्यभरातील साडे 5000 हजारांहून अधिक प्राध्यापक पदे लवकरच भरली जाणार आहेत. ही पदे १ ऑक्टोबर २०२५ रोजीच्या विद्यार्थी संख्येवर आधारित भरली जातील. त्यानुसार संबंधित महाविद्यालयांना विषयवार पदांचा तपशील कळवण्यात आला आहे. त्यामुळे आता महाविद्यालयांकडून रोस्टर तपासणीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची अपेक्षा आहे.

सहाय्यक प्राध्यापक पदांसोबतच ग्रंथपाल व शारीरिक शिक्षण संचालक या पदांची भरतीसुद्धा शासनाने मंजूर केली आहे. त्यामुळे या तिन्ही संवर्गांची एकत्रित बिंदूनामावली (रोस्टर) तपासणी करावी लागणार आहे. एकत्रित आरक्षण निश्चित करताना मागासवर्ग कक्षाकडून या तिन्ही संवर्गातील रिक्त पदांचे आरक्षण आणि प्रत्यक्ष भरावयाच्या पदांचे आरक्षण वेगवेगळे दाखवले जाते. प्रत्यक्ष भरती करताना शासनाने वेळोवेळी जारी केलेल्या शासन निर्णयांचा विचार करणे बंधनकारक आहे.

पुणे विभागीय उच्च शिक्षण संचालक कार्यालयाने पुणे, अहमदनगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांतील ग्रंथपाल व शारीरिक शिक्षण संचालक पदांची माहिती उपलब्ध करून दिली आहे.

Professor Recruitment 2026 : प्राध्यापक व्हायचं स्वप्न आता होणार पूर्ण! राज्य सरकारचा मोठा निर्णय; तब्बल 5500 पदांसाठी भरतीची तयारी सुरू
Chandrashekhar Bawankule : "तर काँग्रेसला तोंड दाखवायला जागा राहणार नाही" बावनकुळेंच्या इशार्‍याने राजकीय वर्तुळात खळबळ!

१ ऑक्टोबर २०२५ रोजी मंजूर झालेल्या व रिक्त असलेल्या या दोन्ही पदांचा पूर्ण तपशील देण्यात आला आहे. त्यामुळे रोस्टर तपासणी प्रक्रियेत शिक्षण संस्थांना कोणतीही अडचण येणार नाही. बिंदूनामावली पूर्ण झाल्यावरच रिक्त जागांचा अधिकृत तपशील समोर येईल आणि त्यानुसार भरती प्रक्रिया राबवली जाईल, असे उच्च शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com