

Pune News : तळेगाव एमआयडीसीमधील एका कार्यक्रमात महायुती आणि महाविकास आघाडीतील दिग्गज नेते एकाच मंचावर आल्याने उपस्थितांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या होत्या. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भाषणासाठी उभ्या ठाकल्या असतानाच, मंचावरील राजकीय हालचालींनी सर्वांचे लक्ष वेधले. निमित्त जरी एका कार्यक्रमाचे असले, तरी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर असल्याने राजकीय चर्चा रंगल्या त्याला निमित्त ठरले मुख्यमंत्र्यांनी सुनेत्रा पवारांचे भाषण सुरु असतानाच जयंत पाटील आणि सुनेत्रा पवार यांच्याशी साधलेला संवाद
सुनेत्रा पवारांनी माईकची सूत्र हाती घेताचं, जयंत पाटलांनी शरद पवारांच्या पाठीमागून येत फडणवीसांच्या बाजूची सुनेत्रा पवारांची खुर्ची धरली. जयंत पाटलांनी थेट देवेंद्र फडणवीसांच्या कानात मनातल्या गोष्टी व्यक्त केल्या. बरं हे सगळं कॅमेऱ्यांमध्ये टिपलं गेलं. जयंत पाटलांनी फडणवीसांच्या कानात कुजबुजत आपल्या मनातल्या गोष्टी सांगितल्या. हा संपूर्ण घटनाक्रम कॅमेऱ्यात कैद झाला. तितक्यात जयंत पाटलांशी कुजबुज संपवून फडणवीसांनी थेट शरद पवारांशीही संवाद सुरु केला.
अगदी मनमोकळ्या या गप्पा सुद्धा कॅमेऱ्यात कैद झाल्या. त्यामुळे सुनेत्रा पवारांच्या भाषणापेक्षाही देवेंद्र फडणवीस हे जयंत पाटील आणि शरद पवारांशी चर्चा करुन काय नवं समीकरण साधतायेत का? की हा केवळ शिष्टाचार होता की येणाऱ्या काळात महायुती आणि राष्ट्रवादीत काही मोठी राजकीय खेळी शिजणार? अशी प्रश्न उपस्थित करत राज्यात नव्या राजकीय चर्चेने जोर धरला.
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरून महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवाराच्या निवडणुकीच्या उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो वापरण्यावर माजी खासदार विनायक राऊत यांनी आक्षेप घेतला आहे. ठाकरेंचे फोटो आणि मशाल चिन्हाचा वापर तातडीनं थांबवा, अन्यथा कायदेशीर कारवाई करू असा थेट इशाराच राऊतांनी दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.