Sharad Pawar: ‘छाती फाडली तरी साहेबच दिसतील’… पवारांनी भाजपचं कमळ असलेलं पत्रक दाखवताच पुढे काय घडलं?

Sharad Pawar’s witty exchange with a farmer during Baramati drought visit: बारामतीतील शेतकरी संवादादरम्यान एका शेतकऱ्याने शरद पवारांवरील निष्ठा व्यक्त केली. त्याचवेळी पवारांनी भाजपचे कमळ असलेले पत्रक दाखवत ‘मग हे काय आहे?’ असा मिश्कील सवाल केला.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama
Published on: 
Updated on: 

Sharad Pawar drought visit: राष्ट्रवादी का्ॅग्रेस शरदचंद्र पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे सध्या महाराष्ट्राच्या दुष्काळाची पाहणी करण्यासाठी राज्यात फिरत आहेत. वयाच्या 86 व्या वर्षी शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा ते ऐकत आहेत. गावागावांत जाऊन ते शेतकऱ्यांशी संवाद साधत असून, पाणी, चारा, पिके आणि शेतीच्या अडचणींची माहिती घेत आहेत. बारामती तालुक्यातील जवळार्जुन येथेही असाच शेतकरी संवाद सुरू असताना एक मिश्कील किस्सा घडला आणि काही क्षणांसाठी गंभीर वातावरणात एकच हशा पिकला.

जवळार्जुन येथे शरद पवार शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेत होते. अनेक शेतकऱ्यांनी दुष्काळाची परिस्थिती, पाण्याची अडचण, चाऱ्याचा प्रश्न तसेच वैयक्तिक समस्या पवारांसमोर मांडल्या. पवारही प्रत्येकाची बाजू शांतपणे ऐकून घेत होते. याचवेळी एका शेतकऱ्याने आपल्या कुटुंबाची पवारांवरील निष्ठा सांगताना जुन्या आठवणींना उजाळा दिला.

‘माझे वडील तुमच्या कृपेने आमदार झाले...’

हा शेतकरी म्हणाला, ‘माझे वडील म्हणजे अशोकभाऊ. तुमच्या कृपेने ते आमदार झाले. ते आम्हाला बारामतीला घेऊन यायचे. माझे वडील नेहमी म्हणायचे की, छाती फाडली तरी त्यामध्ये साहेबच दिसतील.’

शेतकऱ्याने पवारांबद्दल व्यक्त केलेल्या या भावना ऐकून उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. मात्र, शेतकऱ्याचे कौतुक सुरू असतानाच पवारांनी त्याच्याकडील एक पत्र हातात घेतले आणि ते उपस्थितांना दाखवले.

Sharad Pawar
SIR controversy : भाजप-जेडीएसकडून Form 7चा गैरवापर; पात्र मतदारांची नावे वगळली : आरोप करत DK शिवकुमार आक्रमक

‘मग हे काय आहे?’

या पत्रावर भाजपचे कमळ चिन्ह आणि भाजपचे लेटरहेड असल्याचे दिसत होते. पवारांनी ते पत्र उंचावत त्या शेतकऱ्याकडे पाहत मिश्कीलपणे विचारले, ‘मग हे काय आहे?’

पवारांचा हा अनपेक्षित सवाल ऐकताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. काही क्षणांपूर्वी ‘छाती फाडली तरी साहेबच दिसतील’ असे सांगणाऱ्या शेतकऱ्याला पवारांनी त्याच्याच भाजपच्या लेटरहेडकडे लक्ष वेधून दिल्याने हा किस्सा चर्चेचा विषय ठरला.

Sharad Pawar
Pradeep Purnekar Murder Case : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नाव, मीनाक्षी शिंदेंनी मौन सोडले, ठाकरे पिता-पुत्रांवर प्रहार,म्हणाल्या,...

दुष्काळी भागासाठी पाण्याच्या योजनांचा आधार

दरम्यान, शेतकरी संवादात शरद पवारांनी बारामती तालुक्यातील जिरायती भागातील सिंचनाच्या प्रश्नावरही भाष्य केले. जिरायती भागातील शेतकऱ्यांना पाण्याचा आधार मिळावा यासाठी पुरंदर उपसा सिंचन योजना आणि जानाई-शिरसाई सिंचन योजना राबविण्यात आल्या. या योजनांमुळे अनेक गावांमध्ये पाणी पोहोचले असून, शेतीला मोठा आधार मिळाला आहे.

पुरंदर उपसा सिंचन योजनेचे पाणी मोरगावसह परिसरातील गावांमध्ये पोहोचल्याने अनेक शेतकऱ्यांना ऊसासारखी पिके घेणे शक्य झाले. मात्र, बारामती तालुक्यातील जिरायती भागातील शंभर टक्के क्षेत्र अद्याप बागायत करता आलेले नाही, याची खंत असल्याचे पवारांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com