Satbara WhatsApp Service : महसूल विभाग आणखी अ‍ॅडव्हान्स : नागरिकांना सातबारा, 8-अ उतारे थेट व्हॉट्सअ‍ॅपवर मिळणार; फक्त 3 स्टेप्स ठेवा लक्षात

Maharashtra Land Records on WhatsApp : या नव्या उपक्रमामुळे अनेक फायदे होतील. सर्वप्रथम, शेतकऱ्यांना केंद्रांवर जाण्याची गरज राहणार नाही, त्यामुळे वेळ आणि पैसा वाचेल. दुसरे म्हणजे, उताऱ्याची सुरक्षितता वाढेल कारण तो थेट अधिकृत डिजिटल माध्यमातून मिळेल आणि गैरवापराची शक्यता जवळपास संपुष्टात येईल. तिसरे, संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि सोपी होईल.
Satbara WhatsApp Service
Farmers accessing Satbara land records on mobile through WhatsApp, showcasing Maharashtra’s new digital land service initiative.Sarkarnama
Published on
Updated on

Satbara WhatsApp Service : महाराष्ट्राच्या भूमी अभिलेख विभागाने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीसाठी एक महत्त्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण पाऊल उचलले आहे. आता सातबारा (७/१२), ८-अ उतारा, मिळकत पत्रिका (प्रॉपर्टी कार्ड), फेरफार नोंदी आणि ई-रेकॉर्डमधील विविध आवश्यक दाखले थेट व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत.

ही सुविधा महाभूमी संकेतस्थळावरून थेट मोबाईलवर पोहोचवण्यात येणार असून, यासाठी फक्त माफक शुल्कात म्हणजे केवळ १५ रुपयांत नोंदणी करता येईल. सध्या राज्यात गेल्या काही वर्षांपासून सातबारा व इतर उतारे ऑनलाइन उपलब्ध आहेत. मात्र त्यासाठी शेतकऱ्यांना किंवा नागरिकांना जवळच्या सेतू केंद्र किंवा महा ई-सेवा केंद्रावर जावे लागते.

तिथे १५ रुपये शुल्क भरून उतारा काढावा लागतो. अनेकदा केंद्र चालकांकडून अतिरिक्त रक्कम आकारली जाते. उतारा संगणकावर डाउनलोड झाल्यानंतर तो पेन ड्राईव्ह किंवा अन्य माध्यमातून घ्यावा लागतो. या प्रक्रियेत वेळ, श्रम आणि पैसा दोन्ही खर्च होतो. शिवाय डाउनलोड केलेल्या उताऱ्याचा गैरवापर किंवा बनावट प्रती तयार करण्याची शक्यताही कायम राहते.

Satbara WhatsApp Service
Nashik Crime : नाशिक पुन्हा हादरलं! शिंदेंच्या नेत्यावर टोळक्याचा जीवघेणा हल्ला, कार्यालयाबाहेरच कोयत्याने सपासप वार केले अन्...

ही बाब लक्षात घेऊन भूमी अभिलेख विभागाने ही नवी डिजिटल सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. महाभूमी संकेतस्थळावर आपला मोबाईल क्रमांक नोंदवल्यास, केवळ १५ रुपयांच्या शुल्कात सातबारा उतारा, ८-अ उतारा, मिळकत पत्रिका, फेरफारांची नोंद आणि ई-रेकॉर्डमधील इतर महत्त्वाच्या माहितीचे दाखले थेट संबंधित व्यक्तीच्या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर डिजिटल स्वरूपात पाठवले जातील. हे दाखले डाउनलोड करून लगेच वापरता येतील.

Satbara WhatsApp Service
Shivsena UBT : आदित्य ठाकरेंना मिळणार सर्वात मोठी जबाबदारी : बाळासाहेबांनी खास उद्धव ठाकरेंसाठी तयार केलेल्या पदावर होणार नियुक्ती, मुहूर्तही ठरला!

या उपक्रमामुळे अनेक फायदे होतील. सर्वप्रथम, शेतकऱ्यांना केंद्रांवर जाण्याची गरज राहणार नाही, त्यामुळे वेळ आणि पैसा वाचेल. दुसरे म्हणजे, उताऱ्याची सुरक्षितता वाढेल कारण तो थेट अधिकृत डिजिटल माध्यमातून मिळेल आणि गैरवापराची शक्यता जवळपास संपुष्टात येईल. तिसरे, संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि सोपी होईल.

विशेषतः ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी ही सुविधा मोठा दिलासा ठरेल.ही सेवा प्रायोगिक तत्त्वावर प्रथम काही जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात येणार आहे. यशस्वी झाल्यानंतर राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने राबविण्यात येईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com