Shivsena UBT : आदित्य ठाकरेंना मिळणार सर्वात मोठी जबाबदारी : बाळासाहेबांनी खास उद्धव ठाकरेंसाठी तयार केलेल्या पदावर होणार नियुक्ती, मुहूर्तही ठरला!

Uddhav Thackeray Leadership Shift : शिवसेनेच्या वर्धापनदिनी म्हणजेच १९ जूनला हा बदल होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तर बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासाठी शिवसेनेत कार्याध्यक्ष पद तयार केले होते. त्याच पदावर आता आदित्य ठाकरे यांची निवड होणार असल्याचं बोललं जात आहे.
Aaditya Thackeray
Aaditya ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 15 Apr : ठाकरेंच्या शिवसेनेत सर्वात मोठा बदल होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. आगामी पक्षाच्या वर्धापनदिनी उद्धव ठाकरेंकडील सर्व सूत्र आदित्य ठाकरेंकडे दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

त्यानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्याध्यक्ष पदी आदित्य ठाकरे यांची निवड होण्याची शक्यता आहे. तर याबाबतच्या चर्चांना ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील दुजोरा दिला आहे. संजय राऊत यांनी तरूणांना संधी दिली पाहिजे, असं म्हणत या बातमीला दुजोरा दिला आहे.

त्यामुळे आता लवकरच ठाकरेंची शिवसेना भाकरी फिरवणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेच्या वर्धापनदिनी म्हणजेच १९ जूनला पक्षात मोठा बदल केला जाणार आहे. त्यामुळे आता बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासाठी शिवसेनेत जे कार्याध्यक्ष पद तयार केले होते. त्याच पदावर आता आदित्य ठाकरे यांची निवड होणार असल्याचं बोललं जात आहे.

तर या निर्णया संबंधी ठाकरेंच्या शिवेसेनेच्या कार्यकारणीची एक बैठक पार पडणार असून या बैठकीत आदित्य ठाकरेंना कार्याध्यक्ष करण्याचा प्रस्ताव ठेवला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी आदित्य यांच्याकडे दिली जाणार असल्याचंही सूत्रांनी सांगितलं आहे.

Aaditya Thackeray
Nashik Crime : नाशिक पुन्हा हादरलं! शिंदेंच्या नेत्यावर टोळक्याचा जीवघेणा हल्ला, कार्यालयाबाहेरच कोयत्याने सपासप वार केले अन्...

पक्षाच्या बैठकीतील प्रस्तावर निर्णय झाल्यानंतरच पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडून या निर्णयाची अधिकृत घोषणा केली जाऊ शकते. महत्त्वाची बाब म्हणजे शिवसेना पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून आदित्य ठाकरेंना पूर्ण पाठिंबा असल्याची माहिती समोर आली आहे.

Aaditya Thackeray
Prakash Ambedkar : 'समाज जयंतीमध्ये मग्न असताना सरकारचा आरक्षण संपवण्याचा डाव...'; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, म्हणाले, "खदखद बाहेर पडू शकते"

शिवाय या संदर्भात संजय राऊत यांना माध्यमांनी प्रश्न विचारला असता त्यांनी देखील याबाबतचे संकेत दिले आहेत. राऊत म्हणाले, "माननीय उद्धव ठाकरे सुद्धा कालांतराने पक्षाचे कार्याध्य झाले होते. आणि जर आदित्य ठाकरे यांच नाव समोर आलं असेल तर, नक्कीच त्याचं स्वागत केलं पाहिजे. आता तरूण पीढीच्या हाती नेतृत्व देताना या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की पुढचं राजकारण हे तरूणांच्या हातातचं गेलं पाहिजे.", असं म्हणत त्यांनी एक प्रकारे पक्षातील बदलाचे संकेत दिले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com