Maharashtra Market Committee : बाजार समिती संघाच्या सभापतीपदाचा उद्या फैसला; राष्ट्रवादीचा दावा की भाजपची खेळी? सुनेत्रा पवारांच्या निर्णयाकडे लक्ष

Maharashtra Market Committee Chairman Election : गेल्या अनेक वर्ष दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली संघाचे कामकाज चालत होते. त्यांच्या पश्चात बदललेल्या राजकीय परिस्थितीत सहकार क्षेत्रातील पक्षाचे वर्चस्व टिकवण्याचे आव्हान राष्ट्रवादीसमोर आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
Maharashtra Market Committee | NCP vs BJP | Chairman Election
Maharashtra Market Committee | NCP vs BJP | Chairman ElectionSarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune News, 12 Oct : राज्यातील ३०५ कृषी उत्पन्न बाजार समित्यांची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाच्या सभापतीपदासाठी मंगळवारी निवडणूक होत आहे. या निवडीत केवळ संख्याबळ नव्हे, तर महायुतीतील राजकीय ताकद पणाला लागणार आहे. गेली साडेचार वर्षे सभापतीपद राखणाऱ्या राष्ट्रवादीला पुन्हा संधी मिळणार की भाजप अथवा शिवसेना पदावर दावा करणार, याबाबत उत्सुकता आहे.

संघाचे तत्कालीन सभापती प्रवीणकुमार ऊर्फ बाळासाहेब नाहाटा यांच्याविरोधातील अविश्वास ठराव गेल्या महिन्यात मंजूर झाल्याने हे पद रिक्त झाले आहे. आता नव्या सभापतीच्या निवडीच्या निमित्ताने सहकार क्षेत्रातील नेतृत्वावर कोणाची पकड राहणार, याची चाचपणी सुरू झाली आहे.

भाजपला संधी की राष्ट्रवादीचा दावा कायम?

संघावर राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेचे बहुमत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे विरोधकांपेक्षा महायुतीतील वाटाघाटीच निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. पणनमंत्री जयकुमार रावल भाजपचे असल्याने या निवडीत भाजपची भूमिका महत्त्वाची असेल. बाजार समिती संघाचे सभापतीपद आपल्याकडेच ठेवण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न असेल, तर मित्रपक्षांकडूनही संधीची अपेक्षा ठेवली जाऊ शकते.

Maharashtra Market Committee | NCP vs BJP | Chairman Election
MPSC Protest : MPSC आंदोलकांचा मोठा विजय! विवेक भीमनवार यांची मध्यरात्री मोठी घोषणा

सुनेत्रा पवारांच्या भूमिकेची कसोटी

गेल्या अनेक वर्ष दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली संघाचे कामकाज चालत होते. त्यांच्या पश्चात बदललेल्या राजकीय परिस्थितीत सहकार क्षेत्रातील पक्षाचे वर्चस्व टिकवण्याचे आव्हान राष्ट्रवादीसमोर आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यांनी पक्षाचा पारंपरिक दावा कायम ठेवण्यासाठी आग्रह धरला, तर भाजप आणि शिंदे सेनेशी समन्वय साधण्याची कसोटी लागेल.

Maharashtra Market Committee | NCP vs BJP | Chairman Election
Abhijeet Dipke : आंदोलनाबाबत अभिजीत दिपकेंचा मोठा खुलासा; म्हणाले, "कसल्याही बाँडवर सही केलेली नाही..."

दुसरीकडे, पश्चिम महाराष्ट्रातील संचालकाला संधी मिळावी, अशी मागणी पुढे येत आहे. संघाच्या संचालक मंडळाची मुदत आणखी सहा महिने असल्याने उर्वरित काळात बाजार समित्यांच्या प्रश्नांवर प्रभावी काम करण्यासाठी प्रादेशिक प्रतिनिधित्वाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरू शकतो. मंगळवारी होणाऱ्या निवडीत राष्ट्रवादीचा जुना प्रभाव कायम राहतो की महायुतीतील सत्तासमीकरणानुसार पदाचे नवे वाटप होते, हे स्पष्ट होईल. त्यामुळे ही निवड सहकार क्षेत्रातील नेतृत्वाबरोबरच महायुतीतील अंतर्गत ताकद आजमावणारी ठरण्याची शक्यता आहे.

मंगळवारी निवडणूक प्रक्रिया

सभापती निवडीसाठी मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता पुण्यातील मार्केट यार्ड येथील संघाच्या मुख्यालयात अध्यासी अधिकारी तथा पुणे विभागीय जिल्हा उपनिबंधक मोहन निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची सभा होणार आहे. सकाळी साडेअकरा ते दुपारी बारापर्यंत अर्जवाटप व स्वीकृती, त्यानंतर छाननी आणि अर्जमाघारीची प्रक्रिया होईल. दुपारी एक ते दीड या वेळेत मतदान होऊन मतमोजणीनंतर निकाल जाहीर केला जाणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com