Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : पुणे जिल्ह्यातील 20 विद्यमानांपैकी 7 आमदारांचा पराभव तर 13 पुन्हा विधानसभेत

Vidhan Sabha Election Result 2024 : या निवडणुकीत 20 विद्यमान आमदारांपैकी 7 विद्यमानांना पराभव स्वीकारावा लागला. मात्र, जिल्ह्यातून भाजपचे सर्वच्या सर्व विद्यमान आमदार पुन्हा एकदा विधानसभेत गेले आहेत.
Pune Ex MLA
Pune Ex MLASarkarnama
Published on
Updated on

Pune News : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांनी पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघांपैकी 20 मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदारांना संधी दिली होती. तर चिंचवडमध्ये भाजपने विद्यमान आमदार अश्विनी जगताप यांच्या ऐवजी त्यांचे दीर शंकर जगताप यांना यंदा तिकीट दिले. या निवडणुकीत त्यांचा विजय झाला तर इतर 20 विद्यमान आमदारांपैकी 7 विद्यमानांना पराभव स्वीकारावा लागला. मात्र, जिल्ह्यातून भाजपचे सर्वच्या सर्व विद्यमान आमदार पुन्हा एकदा विधानसभेत गेले आहेत.

निवडणुकीमध्ये पुणे जिल्ह्यावर महायुतीचं पूर्णपणे वर्चस्व पाहायला मिळाले. 21 विधानसभेच्या जागांपैकी 18 विधानसभेच्या जागा महायुतीने काबीज केल्या. एक अपक्ष उमेदवार शरद सोनवणे विजय झाले आहेत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात. तर ठाकरेंच्या शिवसेनेला एक जागा जिंकण्यात यश आले आहे.

Pune Ex MLA
Ausa Assembly 2024 Result: औसाः अभिमन्यू पवारांनी चक्रव्यूह भेदला; दिनकर माने यांचा पराभव

आळंदी मतदारसंघात बाबाजी काळे यांनी विद्यमान आमदार दिलीप मोहिते यांना तब्बल 51 हजार मतांनी पराभूत केले आहे. तर वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांचा पराभव करत बापू पठारे यांच्या रूपाने राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने जिल्ह्यात एक जागा जिंकली आहे. तर संपूर्ण पुणे जिल्ह्यातून काँग्रेसचा सुपडासाफ झाला आहे. कसबा, पुरंदर आणि भोर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या विद्यमान आमदारांचा पराभव झाला आहे.

Pune Ex MLA
Latur Assembly 2024 Result: लातूरमध्ये अमित देशमुखांच्या सरंजामी थाटाची 'गढी' उद्ध्वस्त होता होता वाचली

जिल्ह्यातील 21 पैकी तीन जागांवर काँग्रेसचे आमदार होते. त्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघावर भाजपने पुन्हा एकदा झेंडा रोवत रवींद्र धंगेकर यांचा पराभव केला. पुरंदर विधानसभा मतदारसंघातून शिंदेंच्या शिवसेनेचे विजय बापू शिवतारे यांनी विजय मिळवत काँग्रेसचे विद्यमान आमदार संजय जगताप यांचा पराभव केला आहे. तर भोर विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडणूक जिंकणारे संग्राम थोपटे यांना देखील पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. काँग्रेसच्या तीन विद्यमान आमदारांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे.

Pune Ex MLA
Tuljapur constituency : तुळजापूरमध्ये बाजी पलटणार ? राणाजगजितसिंह पाटलांची प्रतिष्ठा पणाला; कोणाचे आहे आव्हान ?

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन विद्यमान आमदार पराभूत झाले आहेत. खेड आळंदी विधानसभा मतदार संघातून दिलीप मोहिते, वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून सुनील टिंगरे तर जुन्नरमधून अतुल बेनके यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

शरदचंद्र पवार पक्षाचे शिरूर विधानसभा मतदारसंघातील आमदार अशोक पवार यांना देखील पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्ञानेश्वर कटके तब्बल 74 हजार 550 मतांनी अशोक पवार यांचा पराभव केला.

Pune Ex MLA
Umarga-Lohara Assembly Election : लोकहिताच्या कामांमुळे मतदार चौथ्यांदा संधी देतील :  ज्ञानराज चौगुले

पराभूत झालेले विद्यमान

1) रवींद्र धंगेकर, काँग्रेस कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ

2) संग्राम थोपटे काँग्रेस भोर विधानसभा मतदारसंघ

3) संजय जगताप काँग्रेस पुरंदर विधानसभा मतदारसंघ

4) दिलीप मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस खेड आळंदी विधानसभा मतदारसंघ

5) अतुल बेनके राष्ट्रवादी काँग्रेस जुन्नर विधानसभा मतदारसंघ

6) सुनील टिंगरे राष्ट्रवादी काँग्रेस वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ

7) अशोक पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष शिरूर विधानसभा मतदारसंघ

Pune Ex MLA
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : विधानसभा अपयशानंतर ठाकरेंच्या दोन शिलेदारांची खासदारकी धोक्यात?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com