Dinkar Mane, Abhimanyu Pawar
Dinkar Mane, Abhimanyu Pawar Sarkarnama

Ausa Assembly 2024 Result: औसाः अभिमन्यू पवारांनी चक्रव्यूह भेदला; दिनकर माने यांचा पराभव

Assembly 2024 Result News : देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आमदार अभिमन्यू पवार यांच्या अडचणी वाढल्या होत्या. मात्र त्यावर मात करत त्यांनी 33,462 मतांनी विजय मिळवला.
Published on

Latur News : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी कोणते उमेदवार पाडायचे, याची यादी जाहीर केली होती. त्यात औसा मतदारसंघाचा समावेश होता. नंतर त्याबाबत जरांगे पाटील फारसे बोलले नव्हते, मात्र तोपर्यंत मराठा समाजात जायचा तो संदेश गेला. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आमदार अभिमन्यू पवार यांच्या अडचणी वाढल्या होत्या. मात्र त्यावर मात करत त्यांनी 33,462 मतांनी विजय मिळवला. (Ausa Assembly 2024 Result News)


Dinkar Mane, Abhimanyu Pawar
Hingoli Assembly 2024 Result : हिंगोलीतील चुरशीच्या लढतीत भाजपच्या मुटकुळेंची हॅट्ट्रिक

मराठा आरक्षण आंदोलनामुळे औशाचे आमदार अभिमन्यू पवार चर्चेत आले होते. अभिमन्यू पवार हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आहेत. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी सुरुवातीला कोणते उमेदवार पाडायचे, या मतदारसंघांची यादी जाहीर केली होती. त्यात लातूर जिल्ह्यातील औसा मतदारसंघाचा समावेश होता. अभिमन्यू पवार हे या चक्रव्यूहात अडकलेले असताना उद्धव ठाकरे यांचे शिलेदार दिनकर माने यांनी आव्हान निर्माण केले होते. हे आव्हान लीलया पेलत चक्रव्यूह भेदण्यात अभिमन्यू पवार यशस्वी झाले आहेत. त्यांनी माने यांचा 33,462 मतांनी पराभव केला


Dinkar Mane, Abhimanyu Pawar
Latur Assembly 2024 Result: लातूरमध्ये अमित देशमुखांच्या सरंजामी थाटाची 'गढी' उद्ध्वस्त होता होता वाचली

औसा विधानसभा मतदारसंघात 2019 मध्ये भाजपचे अभिमन्यू पवार आणि त्यावेळी काँग्रेसमध्ये असलेले बसवराज पाटील (मुरुमकर) यांच्यात लढत झाली होती. पवार यांनी पाटील यांचा पराभव केला होता. उमरगा मतदारसंघ 2009 मध्ये राखीव झाल्यानंतर काँग्रेसने पाटील यांना औशातून उमेदवारी दिली होती. त्यांनी सलग दोनवेळा विजय मिळवला होता. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बसवराज पाटील यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. विशेष म्हणजे, पाटील यांनी या निवडणुकीत पवार यांच्यासाठी प्रचार केला. ते पवार यांच्यासाठी फायदेशीर ठरले.


Dinkar Mane, Abhimanyu Pawar
Umarga-Lohara Assembly Election : ज्ञानराज चौगुले आमचे ओपनिंग बॅट्समन : श्रीकांत शिंदे

महाविकास आघाडीत औसा मतदारसंघ कोणाला सुटणार, याचा तिढा उमेदवारी अर्ज भरण्याच्या तारखेपर्यंत सुटला नव्हता. काँग्रेसने या मतदारसंघावर मजबूत दावा केला होता. काँग्रेसकडून श्रीशैल्य उटगे इच्छुक होते, त्यांनी तयारीही सुरू केली होती. मात्र मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सुटला आणि माजी आमदार दिनकर माने यांना उमेदवारी मिळाली. 2009 आणि 2014 च्या निवडणुकीत त्यावेळी काँग्रेसमध्ये असलेले बसवराज पाटील यांनी दिनकर माने यांचा पराभव केला होता. 2019 मध्ये शिवसेना-भाजपची युती होती. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे आग्रह करून औसा भाजपकडे घेतला होता.


Dinkar Mane, Abhimanyu Pawar
Dharashiv Assembly Election: ठाकरेंवरील निष्ठेमुळे नव्हे तर 'या' धमकीमुळे कैलास पाटील सुरतमधून माघारी फिरले, जुन्या सहकाऱ्याचा मोठा दावा

अभिमन्यू पवार हे फडणवीस यांचे स्वीय सहायक होते. पवार यांच्यासाठीच त्यांनी औसा मतदारसंघ भाजपकडे घेतला होता. दिनकर माने यांनी 1999 आणि 2004 मध्ये या मतदारसंघातून विजय मिळवला होता. या मतदारसंघात त्यांचाही संपर्क आहेच. निलंगा तालुक्यातील कासारशिरसीसह 68 गावांचा औसा विधानसभा मतदारसंघात समावेश आहे. कासारशिरसी येथे उद्धव ठाकरे यांची सभा झाली होती. या सभेत या भागातील भाजपच्या अनेक प्रमुख नेत्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. त्यामुळे पवार यांची अडचण झाली होती.


Dinkar Mane, Abhimanyu Pawar
Ajit Pawar : निकालानंतर अजित पवारांची मोठी कबुली; म्हणाले, 'लाडकी बहीण योजनाच ठरली गेमचेंजर'

देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी अनेकवेळा केला आहे. अभिमन्यू पवार हे फडणवीस यांचे निकटवर्तीय आहेत. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडा, असा संदेश जरांगे पाटील यांनी आधी दिला होता. कोणाला पाडायचे, अशा मतदारसंघांची यादी त्यांनी जाहीर केली होती. त्यात औसा मतदारसंघाचे नाव होते. नंतर जरांगे पाटील यांनी कोणाला पाडायचे ते पाडा, असा संदेश दिला. मात्र तौपर्यंत औसा मतदारसंघासाठीचा संदेश मराठा समाजात पोहोचला होता.


Dinkar Mane, Abhimanyu Pawar
Eknath Shinde : असली शिवसेना अन् राष्ट्रवादी कोणाची याचे उत्तर जनतेने दिले!

औसा मतदारसंघात लातूरच्या देशमुखांचे, विशेषतः माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचे वजन आहे. त्यांच्या शब्दाला मान देणारा वर्ग मोठा आहे. मात्र देशमुखांची जादू या निवडणुकीत चालू शकली नाही. काँग्रेसमध्ये स्थान बळकट करण्यासाठी अमित देशमुख यांना जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणणे गरजेचे होते. मात्र त्यांचीच लातूर शहर मतदारसंघात कोंडी झाली होती. त्यामुळे देशमुखांना औसा मतदारसंघात अधिक लक्ष देता आले नाही.

एखाद्या आमदाराने अमाप संपत्ती जमवली, खूप पैसा कमवला असा प्रचार झाला की मतदारांमध्ये त्या आमदाराविषयी चीड निर्माण होता. प्रचार एेन भरात असताना दिनकर माने यांनी अभिमन्यू पवार यांच्यावर प्रचंड पैसा कमावल्याचा आरोप केला. त्यांच्या प्रॉप्रटीचे कागदपत्रेही जाहीर सभांमधून लोकांना दाखवली. मात्र पवार यांनी मतदारसंघात केलेल्या विकासकामांसमोर हे आरोप फिके पडले. वाढती महागाई आणि सोयाबीनच्या घसरलेल्या दरावर लाडकी बहीण योजना आणि मतदारसंघातील विकासकांमानी मात केली आणि फडणवीस यांचे लाडके अभिमन्यू पवार विजयी झाले.


Dinkar Mane, Abhimanyu Pawar
Devendra Fadnavis : फडणवीसांच्या 'धर्मयुद्धा'ला मतदारांची साथ; सोयाबीन, कापूस, मराठा आरक्षणाचे मुद्दे निष्प्रभ

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com