Mahavikas Aghadi : अबब! पुण्यात 'मविआ'कडून विधानसभा लढवण्यासाठी तब्बल 85 इच्छुक

Pune Mahavikas Aghadi Assembly Election 2024 : पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडीतील काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या तिन्ही मित्र पक्षाकडून तब्बल 85 जण इच्छुक असल्याचे समोर आलं आहे.
Pune Mahavikas Aghadi Assembly Election 2024
Pune Mahavikas Aghadi Assembly Election 2024Sarkarnama
Published on
Updated on

Pune News, 14 Sep : लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या भरघोस यशानंतर आत्मविश्वास द्विगुणीत झालेल्या महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) इच्छुकांची गर्दी पाहायला मिळत आहे.

पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडीतील काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या तिन्ही मित्र पक्षाकडून तब्बल 85 जण इच्छुक असल्याचे समोर आलं आहे.

आगामी विधानसभा निवडणुका महाविकास आघाडी आणि महायुतीतील मित्रपक्ष एकत्रित लढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. असं असलं तरी प्रत्येक पक्ष आपल्या पातळीवर महाराष्ट्रातील 288 जागांची तयारी करत आहे.

ऐनवेळी कोणत्या कारणास्तव महाविकास आघाडी आणि महायुतीची बोलणी फिस्कटली तर निवडणुकीच्या तोंडावर उमेदवाराची शोधाशोध करायला नको, यासाठी सर्व मतदारसंघांमध्ये इच्छुकांना अर्ज करण्याची विनंती पक्षांकडून करण्यात येत आहे.

पुणे (Pune) शहरातील आठ विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून सर्वप्रथम इच्छुकांचे अर्ज मागविण्यात आले होते. यामध्ये काँग्रेसकडून तब्बल 24 जणांनी काँग्रेसच्या तिकिटावर आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा दर्शवली आहे. दुसरीकडे शिवसेना उद्धव ठाकरे गटामध्ये देखील आठ विधानसभा मतदारसंघात तब्बल 20 जण इच्छुक आहेत.

Pune Mahavikas Aghadi Assembly Election 2024
Congress Vs NCP "त्यांनी आमच्या भानगडीत पडू नये," नाना पटोलेंचा अजितदादांच्या नेत्याला थेट इशारा

यामध्ये संजय मोरे आणि गजानन थरकुडे या दोन्ही शहर प्रमुखांचा समावेश आहे. संजय मोरे हे कसबा विधानसभा मतदारसंघामधून इच्छुक आहेत. तर गजानन थरकुडे कोथरूड विधानसभा मतदार संघासाठी फिल्डिंग लावत आहेत.

Pune Mahavikas Aghadi Assembly Election 2024
Bjp News : बीडमधील आणखी एका आमदाराची निवडणुकीला 'ना'! महायुतीला चिंतन करायला लावणारी बाब

सध्या पुणे शहराचा विचार केला तर सर्वाधिक इच्छुकांची संख्या ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षात दिसत आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार गटाचा स्ट्राईक रेट सर्वाधिक राहिला आहे. त्यांनी लढवलेल्या दहा जागांपैकी आठ ठिकाणी उमेदवार विजयी झाले. त्यामुळे तुतारी मिळाली म्हणजे आपला विजय जवळपास निश्चित असंच काहीसं इच्छुकांना वाटत आहे. त्यामुळे पुणे शहरातून तब्बल 41 जणांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे.

याबाबत पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी माहिती दिली. जगताप म्हणाले, "पुढील 60 दिवसांमध्ये महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका होणे अपेक्षित आहे. केंद्रीय निवडणूक आयोग कुठल्याही क्षणी निवडणुकीची घोषणा करू शकतो. महाविकास आघाडी म्हणून आम्ही आगामी निवडणुकांची जय्यत तयार केली आहे. मात्र अद्याप जागा वाटपाचे सूत्र ठरलेलं नाही.

महाराष्ट्रातील 288 पैकी कोणत्या जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसला जाणार याबाबत अद्याप एकमत झालेलं नाही. तरीदेखील प्रत्येक पक्ष आपापल्या पातळीवर आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी करत आहे. त्याच अनुषंगाने शरद पवार गटाने पुणे शहरातील इच्छुकांचे अर्ज मागवले होते. मागील दहा दिवसांपासून ही प्रक्रिया सुरू होती.

आज अखेर 41 जणांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून निवडणूक लढवण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे. ही यादी राज्यातील वरिष्ठांकडे पाठवण्यात आली असून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ही यादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे देतील त्यानंतर अंतिम निर्णय होईल."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com