Mahavikas Aghadi : 'मविआ'च्या तिन्ही पक्षांना का हवेत शिवाजीनगर, कॅन्टोन्मेंट अन् हडपसर मतदारसंघ?

Assembly Election 2024 : लोकसभेला मविआला मिळालेल्या यशात आपल्याच पक्षाचा मोठ्या वाटा असल्याचं सांगत आहेत. त्यासह विधानसभेला महाराष्ट्रात मोठा भाऊ असल्याचा दाखवून देण्याचा प्रयत्न या पक्षातील नेते आणि कार्यकर्ते करत आहेत.
sharad pawar | uddhav thackeray | Nana  Patole
sharad pawar | uddhav thackeray | Nana Patole Sarkarnama

Pune News : लोकसभेचा निकाल लागतात महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांनी विधानसभेसाठी कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. यात लोकसभेमध्ये चांगले यश मिळवून आत्मविश्वास वाढलेल्या महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष आघाडीवर आहेत.

लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला ( Mahavikas Aghadi ) मिळालेल्या यशात आपल्याच पक्षाचा मोठ्या वाटा असल्याचं सांगत आहेत. आपणच विधानसभेला महाराष्ट्रात मोठा भाऊ असल्याचा दाखवून देण्याचा प्रयत्न या पक्षातील नेते आणि कार्यकर्ते करत आहेत. यातूनच विधानसभा निवडणुकीपूर्वीच जागांच्या दाव्याने महाविकास आघाडीमध्ये कुरबुर सुरू झाली आहे.

पुणे लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पराभव स्वीकारावा लागला. तरी भाजपचा ( bjp ) गड असलेल्या पुणे लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने कडवी टक्कर दिली. मात्र, भाजपाचा मताधिक्य कमी करण्याशिवाय अधिकच यश त्यांना प्राप्त झालं नाही. या पराभवात देखील महाविकास आघाडीसाठी काही 'पॉझिटिव्ह' गोष्टी समोर आल्या आहेत. 2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये तीन लाखांचं मताधिक्य भाजप उमेदवाराला मिळालं होतं. यावेळी मात्र ते मताधिक्य निम्म्याहून कमी झालं आहे.

sharad pawar | uddhav thackeray | Nana  Patole
Pune Ncp News : राष्ट्रवादीचा दावा कायम; पुण्यातल्या 6 जागा जिंकण्याचा विश्वास, पण निर्णय साहेब घेतील

तसेच, शहरातील काही विधानसभा मतदारसंघांमध्ये 'मविआ'नं आघाडी घेतली असल्याचं चित्र पाहायला मिळालं. पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडी घेतलेले भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ ( Murlidhar Mohol ) यांना कॅन्टोन्मेंट मतदारसंघांमध्ये मात्र पिछाडीवर राहावं लागलं. या ठिकाणीतब्बल 15000 हून अधिक मते ही काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी मिळाली. आगामी निवडणुकांमध्ये हा विधानसभा मतदारसंघ भाजपाकडून हिसकावून घेता येईल, याचा आत्मविश्वास महाविकास आघाडीतल्या नेत्यांना आला आहे. त्यामुळे या जागेवरती तिन्ही पक्ष आपला दावा करत आहेत.

तसेच शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये येणारा हडपसर विधानसभा मतदारसंघात देखील महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे ( Amol Kolhe ) यांना चांगले मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे अजित पवार गटाचे आमदार असलेल्या चेतन तुपे यांना हा कुठेतरी धक्का मानला जात आहे. त्यामुळे या ठिकाणी देखील महाविकास आघाडीला शुभ संकेत दिसत आहेत. येथेही तिन्ही पक्षांकडून हक्क सांगितला जात आहे.

त्या पाठोपाठ शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघांमध्ये अवघ 3000 चे मताधिक्य हे मुरलीधर मोहोळ यांना मिळालं होतं. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत चांगला उमेदवार दिल्यास या ठिकाणचा विजय देखील आपण खेचून आणू शकतो, असा विश्वास महाविकास आघाडी मधील नेत्यांना वाटत आहे. त्यामुळे ही जागा देखील जागा वाटपामध्ये आपल्याला सुटावी यासाठी तिन्ही पक्षाचे नेते प्रयत्न करताना दिसत आहेत.

sharad pawar | uddhav thackeray | Nana  Patole
Pune Vidhan Sabha : पुण्यातील विधानसभेच्या सहा जागांवर दावा; ठाकरे गटाचे नेमके गणित काय?

जागा वाटपावरून स्थानिक पातळीवर नेते एकामेकांशी भिडल्याचं पाहायला मिळत असतानाच वरिष्ठ पातळीवर मात्र अद्याप अधिकृतरित्या जागा वाटपाबाबत कोणतीही चर्चा सुरू नसल्याचे पाहायला मिळत आहे. पण, वरिष्ठ पातळीवर जागा वाटपाच्या चर्चा सुरू झाल्यानंतर अशाच प्रकारची जागा मिळावण्याची चढाओढ तिन्ही पक्षांमध्ये पाहायला मिळेल. कदाचित यावरून आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. तसेच अशीच काहीशी परिस्थिती महायुतीमध्ये पण होण्याचे संकेत आत्तापासूनच मिळत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com