Pune Politics : '...तर परिणाम वाईट होतील'; लोकसभेसाठी इच्छुक असणाऱ्यांच्या पालिका अधिकाऱ्यांना धमक्या ?

Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये पक्षाचे उमेदवार असलेला अविर्भाव आणून काही इच्छुक मिरवताना दिसत आहेत.
Pune Municipal Corporation
Pune Municipal CorporationSarkarnama
Published on
Updated on

Pune News: पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेसकडून वीस तर भाजपकडून पंधरा तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्याकडून तब्बल दहा जण इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. अद्याप तरी कोणत्याही पक्षाकडून लोकसभा उमेदवार कोण असेल याबाबत वाच्यता करण्यात आलेली नाही. असं असताना देखील आपणच आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये पक्षाचे उमेदवार असलेला अविर्भाव आणून काही इच्छुक मिरवताना दिसत आहेत. (Lok Sabha Election 2024)

यातील काही इच्छुकांनी पक्षाकडून आपल्यालाच उमेदवारी मिळणार असल्याचा समज करून जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. या निमित्ताने शहरात सांस्कृतिक कार्यक्रमाचे मोहोळ उठले आहे. या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून नेते मंडळींचाही वावर शहरात वाढला आहे.

परिणामी शहरभरात आपल्या कार्यक्रमाचा प्रचार आणि नेत्याच स्वागत करण्यासाठी फ्लेक्स बाजी करण्यात येत आहे. यातील काही फ्लेक्स अधिकृत ठिकाणी लावलेले असले तरी बहुतांश हे अनधिकृत पणे लावले गेले आहेत. यातून शहराचे विद्रोपीकरण होत असताना पालिकेला मात्र बघ्याची भूमिका घ्यावी लागत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Pune Municipal Corporation
Pune: शिंदे, फडणवीस, अजितदादांमध्ये श्रेय वादाची लढाई; निधीअभावी रस्ता रखडला...

शहरांमध्ये रस्त्यावरती वाढणारे अतिक्रमण सामान्य माणसांसाठी डोकेदुखी ठरत असताना हे अतिक्रमण हटवण्यासाठी पालिकेकडे नागरिक तगादा लावत आहेत. महापालिका देखील नागरिकांच्या समाधान करण्यासाठी तात्पुरती कारवाई करत असून महापालिका अधिकाऱ्यांनी पाठ फिरली की अतिक्रमणाची परिस्थिती जैसे थे होत आहे.

अतिक्रमण कारवाई दरम्यान शहरातील महत्त्वाच्या चौकांमधील राजकीय फ्लेक्स काढताना पालिका कर्मचाऱ्यांना संकटांचा सामना करावा लागत आहे. काढण्यासाठी गेलेल्या अतिक्रमण निरीक्षकांना फ्लेक्स काढले तर परिणाम वाईट होतील, अशा धमक्या दिल्या जात आहेत. फ्लेक्स आणि अतिक्रमण कारवाईला राजकीय दबाव येत असल्याचं समोर आला आहे.

शहरातील भिंतींवर घोषवाक्य लिहून विद्रुपीकरण

भाजपकडून 'स्वच्छ भारत अभियाना'चा एकीकडे गाजावाजा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून पासून ते भाजपाचा सामान्य कार्यकर्ते हातात झाडू घेऊन स्वच्छतेचा पाठ देशाला पढवताना पाहायला मिळतात. मात्र दुसरीकडे निवडणूक आल्यानंतर हा पाठ भाजपचे नेते आणि कार्यकर्ते विसरलेत की काय ? असा प्रश्न सध्या शहरातील भिंतीकडे पाहिल्यानंतर येत आहे.

भाजपच्या वरिष्ठ नेत्याने नुकतेच झालेल्या पदाधिकारी बैठकीत सार्वजनिक आणि खासगी सोसायट्यांच्या भिंतींवर ‘कमळ’ या चिन्हासोबतच मोदींना तिसर्‍यांदा पंतप्रधान करण्यासाठीची स्लोगन (घोषवाक्य) पेंट करण्याचे आदेश दिले आहेत आणि आपल्या नेत्याच्या आदेश पाळण्यासाठी शहरातील पदाधिकाऱ्यांनी भिंतीला रंगवण्याचा धडाका लावलाय, यामुळे शहराचे विद्रूपीकरण होत असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. मात्र भाजप नेते याकडे कानाडोळा करताना पाहायला मिळत आहेत.

(Edited By-Ganesh Thombare)

Pune Municipal Corporation
CM Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदे अन् गुंड निलेश घायवळच्या भेटीचा फोटो; राजकीय वर्तुळात खळबळ

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com