Maratha Reservation : गणेशोत्सवानंतर आंदोलनाचा निर्णय करावा, बहुतांश मागण्यांवर सकारात्मक कार्यवाही सुरू; विखेंचं जरांगेंना आवाहन

Radhakrishna Vikhe Patil: मराठा आरक्षणाच्या बहुतांश मागण्यांवर कार्यवाही सुरू असल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. गणेशोत्सवात आंदोलनामुळे भाविकांना त्रास होऊ नये, यासाठी आंदोलनानंतर निर्णय घ्यावा, असे आवाहन केले.
Manoj Jarange, Radhakrishna Vikhe Patil
Manoj Jarange, Radhakrishna Vikhe PatilSarkarnama
Published on
Updated on

Maratha protest News : "मराठा आरक्षणाच्या मागण्यांबाबत राज्य सरकारने बहुतांश मागण्यांवर सकारात्मक कार्यवाही सुरू केली आहे. सातारा आणि कोल्हापूर गॅझेटच्या मागण्यांबाबत काही कायदेशीर अडचणी असल्याने त्याबाबत ॲडव्होकेट जनरल यांचे मत मागविले आहे. त्यामुळे या प्रक्रियेसाठी वेळ द्यावा आणि गणेशोत्सवाच्या काळात आंदोलनामुळे भाविकांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी. गणेशोत्सवानंतर आंदोलनाबाबत निर्णय घ्यावा," असे आवाहन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे यांना बुधवारी केले.

पुण्यात जलसंपदा विभागाच्या अभियांत्रिकी सेवेतील उत्कृष्ट अभियंता पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. "जरांगे यांच्या मागण्यांपैकी बहुतांश मागण्यांवर सरकारने केवळ आश्वासन न देता कार्यवाही सुरू केली आहे. हैदराबाद गॅझेटसंदर्भातील प्रकरण न्यायालयात सुरू असताना नवीन गॅझेट काढल्यास आणि त्यावर न्यायालयाने स्थगिती दिल्यास कायदेशीर पेच निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कायदेशीर मत मिळाल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल, असे विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांबाबत जरांगे यांच्याकडून वापरल्या जाणाऱ्या अपशब्दांबाबतही विखे म्हणाले, "आंदोलन आणि मतप्रदर्शनाचा अधिकार लोकशाहीत आहे; मात्र वक्तव्य करताना संस्कृतीचे भान ठेवले पाहिजे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी केलेल्या कामाचा विचार करून त्यांच्याबाबतची वक्तव्ये टाळावीत."

Manoj Jarange, Radhakrishna Vikhe Patil
Pune Online Gaming Dispute News : पुण्यात ऑनलाइन गेमच्या वादातून रील स्टार्सकडून तरुणावर वार ; सुनेत्रा पवारांचा थेट CP अमितेश कुमारांना फोन

चर्चेची दारे खुली...

"मनोज जरांगे यांच्या शिष्टमंडळातील अभ्यासकांशी सरकारचा संवाद सुरू असून चर्चेची दारे बंद केलेली नाहीत. आंदोलन बळाचा वापर करून थांबविण्याची सरकारची भूमिका नाही. संवादातून प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न सुरू आहे. गणेशोत्सवाच्या काळात भाविकांना त्रास होऊ नये, यासाठी जरांगे यांनी आंदोलन स्थगित करावे," अशी अपेक्षा असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.

Manoj Jarange, Radhakrishna Vikhe Patil
Chandrakant Patil : ‘मुंबईत आंदोलन नको, चर्चेने प्रश्न सोडवू’; जरांगे पाटलांना चंद्रकांत पाटलांचे आवाहन

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com