Maval Tehsildar Transfer: मावळ तहसीलदारांच्या खुर्चीसाठी रस्सीखेच! मंत्रालयात लॉबिंग; महिला अधिकारीही सरसावल्या

Maval Tehsildar News: मावळच्या तहसीलदार पदासाठी इच्छुक अधिकाऱ्यांमध्ये चुरस वाढली आहे. विद्यमान तहसीलदार विक्रम देशमुख यांच्या संभाव्य बदलीपूर्वी मंत्रालयात पाठपुरावा आणि लॉबिंग सुरू असल्याची चर्चा आहे.
Maval Tehsildar Vikram Deshmukh Transfer news
Maval Tehsildar Vikram Deshmukh Transfer newsSarkarnama
Published on
Updated on

विजय सुराणा

तळेगाव दाभाडे : मावळ तालुक्याच्या लवकरच नवीन तहसीलदार मिळणार आहे. त्यासाठी या महत्त्वाच्या खुर्चीसाठी इच्छुक अधिकाऱ्यांनी हालचाली सुरू केल्याची चर्चा महसूल विभागात रंगली आहे. विद्यमान तहसीलदार विक्रम देशमुख यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्णत्वाकडे जात असल्याने आगामी बदली प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याच पार्श्वभूमीवर मावळच्या तहसीलदार पदासाठी अनेक अधिकारी प्रयत्नशील असल्याचे बोलले जात आहे.

महसूल विभागातील सूत्रांच्या माहितीनुसार, सुमारे दहा ते बारा तहसीलदार या पदासाठी इच्छुक असून, त्यात काही महिला अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याची चर्चा आहे. या पदावर नियुक्ती मिळवण्यासाठी इच्छुक अधिकाऱ्यांकडून विविध स्तरांवर संपर्क साधले जात असल्याचे सांगितले जाते. काहींनी राजकीय नेते, लोकप्रतिनिधी तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मंत्रालयात पाठपुरावा सुरू केल्याची माहिती समोर येत आहे.

Maval Tehsildar Vikram Deshmukh Transfer news
LPG Price Hike: गॅस सिलेंडर पुन्हा महागणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत; सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार फटका

मावळ तालुका हा पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या तालुक्यांपैकी एक मानला जातो. औद्योगिक गुंतवणूक, पर्यटन विकास आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील वाढत्या व्यवहारांमुळे या तालुक्याचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, औद्योगिक वसाहती तसेच मोठ्या गृहप्रकल्पांमुळे जमिनींच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. परिणामी महसूल विभागाशी संबंधित कामकाजाचे प्रमाणही लक्षणीय वाढले आहे.

Maval Tehsildar Vikram Deshmukh Transfer news
Shiv Sena Leader Firing: एकनाथ शिंदे यांच्या नेत्यावर जीवघेणा हल्ला; धावत्या कारवर दुचाकीस्वारांकडून गोळीबार

तालुक्यातील जमीन व्यवहार, कुळकायदा प्रकरणे, वतन जमिनी, आदिवासी जमिनींचे प्रश्न, खाणी, स्टोन क्रशर, विटभट्ट्या आणि विविध परवानग्यांशी संबंधित विषयांमध्ये तहसीलदारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. अनेक संवेदनशील प्रकरणांमध्ये तहसीलदारांच्या अहवालाला आणि निर्णयाला मोठे प्रशासकीय महत्त्व असते. त्यामुळे या पदावर नियुक्ती मिळवण्यास अधिकाऱ्यांमध्ये विशेष उत्सुकता असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Maval Tehsildar Vikram Deshmukh Transfer news
Shetkari Karjmafi: ₹2 लाखांची कर्जमाफी हुकणार? 'या' शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय

महसूल खाते हे राज्य प्रशासनातील प्रभावशाली विभागांपैकी एक मानले जाते. अशा परिस्थितीत आर्थिक आणि प्रशासकीय दृष्ट्या महत्त्वाच्या मावळ तालुक्यात नियुक्ती मिळवण्यासाठी स्पर्धा वाढली आहे. मंत्रालय स्तरावर विविध शिफारशी, संपर्क आणि लॉबिंग सुरू असल्याच्या चर्चांनी महसूल वर्तुळात रंग भरला आहे. आता आगामी बदली प्रक्रियेत मावळच्या तहसीलदारपदी कोणाची नियुक्ती होते, याकडे प्रशासनासह राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com