Pune News : पुण्यातून भाजपला धक्का! 6 वेळा आमदार आणि 2 वेळा खासदार असलेल्या कुटुंबातील व्यक्ती काँग्रेसमध्ये दाखल

Mayursinh Patil Join Congress : इंदापूरचे भाजप नेते मयूरसिंह पाटील यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये पुनर्प्रवेश केला. तीन पिढ्यांचा काँग्रेसशी संबंध आणि वैचारिक जडणघडण हे निर्णयामागील कारण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Mayursinh Patil
Mayursinh PatilSarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune, 21 November : इंदापूर तालुक्यातील भाजप नेते, इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आणि दुधगंगा तालुका दूध उत्पादक संघाचे माजी अध्यक्ष मयूरसिंह पाटील यांनी भाजपला रामराम ठोकत पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील यांचे चुलत भाऊ आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेसचा 'हात' धरला आहे. तीन पिढ्यांचा काँग्रेसशी असलेला संबंध आणि वैचारिक जडणघडण यामुळे स्वगृही परतण्याचा निर्णय घेतल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

मयूरसिंह पाटील हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि त्यांचे चुलते दिवंगत शंकरराव पाटील यांच्या राजकीय वारशातील आहेत. शंकरराव पाटील यांनी इंदापूर विधानसभा मतदारसंघातून सहा वेळा आमदार, तर बारामती लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा खासदार म्हणून प्रतिनिधित्व केले होते.

काँग्रेसशी निष्ठा असलेल्या या कुटुंबातील मयूरसिंह पाटील यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मात्र हर्षवर्धन पाटील यांची साथ सोडत अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांना पाठिंबा दिला होता. त्यानंतर प्रवीण माने यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या पाठोपाठ मयूरसिंह पाटील यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता पुन्हा काँग्रेसमध्ये परतल्याने त्यांच्या राजकीय भूमिकेची चर्चा सुरू झाली आहे.

काँग्रेस प्रवेशावेळी मयूरसिंह पाटील यांनी भाजपमधील वैचारिक वातावरणावर टीका केली. ते म्हणाले, "माझ्या तीन पिढ्या काँग्रेसमध्ये गेल्या आहेत. माझे चुलते शंकरराव पाटील यांनी संपूर्ण हयात काँग्रेसमध्ये घालवली. आमची जडणघडण काँग्रेसच्या विचारसरणीतून झाली असून, माझा विचार पहिल्यापासून काँग्रेसचाच राहिला आहे. तालुक्यातील तत्कालीन राजकीय परिस्थितीमुळे आम्हाला भाजपमध्ये जावे लागले. आम्ही आमच्या नेत्यांसोबत भाजपमध्ये गेलो होतो.

Mayursinh Patil
Satara Politic's : भाजप जिल्हा बॅंकेतील शिवसेना-राष्ट्रवादीच्या खेळीचा वचपा काढणार? झेडपी, पंचायत समितीतील ‘स्वीकृत’ निवड रडावर

भाजपमध्ये काही वर्षे काम करताना मानसन्मान मिळाला. आपण पक्षाच्या कोअर टीममध्येही होतो. मात्र, भाजप आणि काँग्रेसच्या विचारसरणीत मोठी तफावत असल्याची खदखद मनात होती, असे त्यांनी सांगितले.

Mayursinh Patil
Sugarcane FRP : बबनदादा, राजन पाटील, प्रशांत परिचारक, अभिजीत पाटलांमुळे सोलापुरात ऊसदराची कोंडी : ‘स्वाभिमानी’च्या नेत्याचा घाणाघाती आरोप

भाजपची राजकीय विचारसरणी हिंदू-मुस्लिमांमध्ये संघर्ष आणि जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करून सत्ता टिकवण्यावर आधारित असल्याचा आरोपही त्यांनी केला. काँग्रेसने अशी भूमिका कधी स्वीकारली नाही, असे म्हणत पुन्हा काँग्रेसमध्ये येण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.