MNS News: 'राज'पुत्राचा भाजपला पुण्यात पहिला दणका; छत्रपती शिवरायांसोबत मोदींचा फोटो; मनसेच्या अमित ठाकरेंनी रागानं नजर टाकताच पुढच्या क्षणी...

MNS Vs BJP: मनसेच्या अमित ठाकरेंनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरुन आक्रमक भूमिका घेतली असून पुण्यातील शैक्षणिक भ्रष्टाचाराची दहीहंडी फोडणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यातच आता पुण्यात पाऊल ठेवताच ठाकरेंच्या पुत्रानं पहिली झलक दाखवली आहे.
Amit Thackeray MNS PM Modi Photo    .jpg
Amit Thackeray MNS PM Modi Photo .jpgSarkarnama
Published on
Updated on

Pune News: कॉक्रोच जनता पार्टीनं 'जेन झीं'ना सोबत घेऊन केंद्र सरकारलाही दणका दिला होता. यानंतर त्यांनं राज्यभरातील शाळेच्या दुरवस्थेसंदर्भात 'स्कूल ठीक करो' अभियान राबवलं जात आहे. 'सीजेपी'नंतर सर्व प्रादेशिक पक्षांनीही 'जेन झीं'कडे आपला मोर्चा वळवला आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे नेते अमित ठाकरेही पुणे दौऱ्यावर आले असून ते सात कॉलेजला भेट देणार आहे.पुण्यात पाऊल ठेवताच त्यांनी भाजपला ललकारलं आहे.

'राज'पुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे हे सोमवारी(ता.31)पुणे दौऱ्यावर आले असून ते पुण्यातील सात कॉलेजला भेट देणार आहेत.या दौऱ्यावेळी त्यांनी कॉलेजमधील जेन-झी विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.ते विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्यांना वाचा फोडण्याचं काम करणार आहे.

पुणे शहरातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाला भेट देत असतानाच वसतिगृह अधीक्षकांच्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेजारी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दिसून आला. या फोटोकडे त्यांनी रागानं नजर टाकली. तसेच तो फोटो हटवायला लावला. यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी पुढच्याच क्षणी मोदींचा फोटो हटवला.फोटो हटवण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

मनसेच्या अमित ठाकरेंनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरुन आक्रमक भूमिका घेतली असून पुण्यातील शैक्षणिक भ्रष्टाचाराची दहीहंडी फोडणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यातच आता पुण्यात पाऊल ठेवताच ठाकरेंच्या पुत्रानं पहिली झलक दाखवली आहे.

Amit Thackeray MNS PM Modi Photo    .jpg
Sudhir Mungantiwar : 'मी केवळ एक आमदार, सरकारचा भाग नाही'; भाजपच्या बैठकीआधीच भाजपच्या माजी मंत्र्याचे धक्कादायक विधान

पुण्यातील शासकीय तंत्रशिक्षण महाविद्यालयातील वसतिगृह, खानावळ आणि स्वच्छतागृहांच्या दुरावस्थेची अमित ठाकरेंनी पाहणी केली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशीही चर्चा केली. यावेळी विद्यार्थ्यांनी अमित ठाकरेंसमोर तक्रारींचा पाढाच वाचला.

यानंतर संतापलेल्या ठाकरेंनी महाविद्यालयाच्या वसतिगृहाची खराब अवस्था,अस्वच्छ स्वच्छतागृहे ,खानावळीतील निकृष्ट दर्जाचं जेवण, सीसीटीव्ही कॅमेरे अशा विविध मुद्द्यांवरुन महाविद्यालय प्रशासनाला धारेवर धरले. याचदरम्यान, एका विद्यार्थ्याने डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपत्री शिवाजी महाराजांच्या बाजूला पंतप्रधान मोदींचा फोटो असल्याचं ठाकरेंच्या निदर्शनास आणून दिलं.

Amit Thackeray MNS PM Modi Photo    .jpg
Maharashtra Politics : मंत्रिपदावरून महायुतीत नाराजीचे सूर? 'बाहेरून सरदार आले आणि मंत्री झाले', बड्या नेत्याचा घरचा आहेर

त्यानंतर अमित ठाकरे मोदींच्या फोटोकडे रागानं कटाक्ष टाकत संबंधित फोटो कार्यालयाच्या भिंतीवरुन हटवण्याच्या सूचना मनसे कार्यकर्त्यांना दिल्या. त्यानंतर पुढच्या क्षणी मनसे कार्यकर्त्यानं पंतप्रधान मोदींचा फोटो खाली उतरवला.हा फोटो काढतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो हटवण्यावरुन भाजपा आक्रमक झाली आहे. त्यामुळे अमित ठाकरेंच्या या व्हायरल होत असलेल्या फोटो काढण्याच्या व्हिडीओमुळे भाजप विरुद्ध मनसे असा नवा राजकीय वाद पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com