MNS Vasant More : अजितदादांनी 'टिल्लू' पक्ष म्हणून मनसेला हिणवलं, अन् दुसऱ्याच वर्षी 29...; वसंत मोरेंनी सांगितला किस्सा

Pune Municipal Corporation : पुणे महापालिकेत पक्षाने मिळविले होते यश; विरोधकांना मिळाले सडेतोड उत्तर.
Ajit Pawar, Vasant More
Ajit Pawar, Vasant MoreSarkarnama
Published on
Updated on

Pune News : टिल्लू पक्ष असे हिणवलं म्हणून अजितदादांना पुणे महापालिकेत मनसेने चोख प्रत्युत्तर दिले होते. दोन नगरसेवक असताना त्यावरून 29 नगरसेवकांची फौज उभी करणाऱ्या मनसेने त्यांना पक्षाची ताकद दाखविली होती. याबाबतचा किस्सा मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी दिलेल्या मुलाखतीत सांगितला. तसेच मनसेच्या पदाधिकाऱ्यांत मतभेद असले तरी मनभेद नाहीत, असेही मोरेंनी सांगितले. (MNS Vasant More Told the story of Ajit Pawar being called Tillu Party)

पुण्यात मनसे म्हटल की, वसंत मोरे (Vasant More) हे एक समीकरणच झाले आहे. नगरसेवक मोरे यांनी पक्षाला ताकद दिली आहे. पुणे महापालिकेची 2012 ला निवडणूक झाली, त्यामध्ये मनसेला दोन जागांवर समाधान मानावे लागले होते. त्यामध्ये वसंत मोरे आणि साईनाथ बाबर या मनसैनिकांचा समावेश होता. त्यावरून राष्ट्रवादीचे अजित पवार (Ajit Pawar) यांनी मनसेला टिल्लू पक्ष म्हणून हिणवलं.

Ajit Pawar, Vasant More
NCP Crisis : ‘त्याचा राजीनामा आजही माझ्या खिशात’; अजितदादा असं कोणाबद्दल म्हणाले?

मात्र, त्यानंतर दुसऱ्याच वर्षी झालेल्या 2017 च्या महापालिका निवडणुकीत मनसेने 29 नगरसेवक निवडून आणले होते. त्यामुळे मनसेला टिल्लू पक्ष म्हणणाऱ्या अजित पवारांना सडेतोड उत्तर मिळाले असल्याचा किस्सा वसंत मोरे यांनी 'सरकारनामा'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितला. तसेच मनसेमध्ये जे काही गटतट आहेत. ते बाजूला टाकले आणि सर्व वरिष्ठ पदाधिकारी एकत्र आले आणि एक ताकद दाखविली तर काय होऊ शकते हे त्यावेळी मनसेने दाखवून दिल्याचे त्यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यावेळी टिल्लू पक्ष म्हणून ज्यांनी हिणवलं त्यांना 29 नगरसेवक आणूण दाखविले होते. तोच इतिहास पुन्हा घडवू शकतो. त्यासाठी मनसेच्या सर्वांची एकी असणे गरजेचे आहे. यावर मोरे म्हणाले, राजकारणामध्ये काहीच अशक्य नाही. everything is possible. प्रत्येक गोष्ट तुम्हाला शक्य आहे, फक्त तुमचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड पाहिजे आणि तो माझ्यात आहे.

कारण आजपर्यंत जी काही स्वप्ने पाहिली ती पूर्ण करत आलो आहे. त्याचप्रमाणे मनसैनिकांत जी एकी पाहिजे, ती पण आहे. आमच्यात मतभेद आहेत मात्र मनभेद नाहीत आणि ज्या दिवशी राज ठाकरे येतात तेव्हा सर्वजण एकत्र शहर कार्यालयात येतात. त्यावेळी आयोजित कार्यक्रमाला सर्वच पदाधिकारी झटत असतात. तेव्हा गटतट बाजूला ठेवून काम करत असल्याचे मोरे यांनी सांगितले.

जय-विरू जोडी...

मोदींची लाट आली तरीदेखील मनसेचे दोन नगरसेवक त्यात तरले. ते म्हणजे वसंत मोरे आणि साईनाथ बाबर होय. त्यांना पुणेकर जय-विरूची जोडी म्हणून आजही ओळखतात. त्यानंतर पाच वर्षे पुणेकरांनी विरोधी पक्षाच्या माध्यमातून मनसेचे काम पाहिले. त्यात वसंत मोरे आणि साईनाथ बाबर यांची जोडी म्हटलं की काहीतरी वेगळं होणार, हे निश्चित होतं. आज तेच जय - विरू आज एकमेकांवर खट्टू झालेत का ? असा प्रश्न आहे.

या प्रश्नावर वसंत मोरे म्हणाले, राजकारणामध्ये कोणी कोणाचा निरंतर काळाचा दुश्मन नसतो. ज्या दिवशी साईनाथ बाबर शहरप्रमुख झाले. त्यावेळी पहिली पोस्ट माझी होती, की मीच तुझा मावळा, असाही एक किस्सा त्यांनी सांगितला.

R

Ajit Pawar, Vasant More
Nikhil Wagle Nirbhay Bano : निखिल वागळेंच्या 'निर्भय बनो'ला भाजपचा विरोध; सभा उधळून लावण्याचा प्रयत्न!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com