Mock Drill : पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकनंतरही आजच होणार मॉक ड्रिल, जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितल्या सहा जागा आणि वेळ

Mock Drill Planned in Pune : मॉर्क ड्रीलची गांर्भियता लक्षात घेता सर्व संबंधित यंत्रणांनी अतिशय शिस्तबद्ध पध्दतीने काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या आहेत.
Mock Drill
Mock DrillSarkarnama
Published on
Updated on

Mock Drill News : गृहमंत्रलायाच्या निर्देशानुसार युद्धजन्यपरिस्थिचा सामना करण्यासाठी मॉक ड्रिल करण्याची तयारी सोमवारपासून सुरू होती. मात्र, मंगळवारी मध्यरात्री पाकिस्तानवर भारतीय लष्कराने एअर स्ट्राईक केल्याने मॉक ड्रिल होणार की नाही याबाबत संभ्रम होता. मात्र, पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी मॉक ड्रिल होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

'केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे युद्धजन्य परिस्थितीत काळजी घेण्याच्यादृष्टीने विधानभवन, मुळशी पंचायत समिती, तळेगाव नगरपरिषद, वनाज औद्योगिक वसाहत, पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका या ठिकाणी आज (मंगळवारी) दुपारी चार वाजता ‘मॉक ड्रिल’ घेण्यात येणार आहे', असे जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले.

Mock Drill
Operation Sindoor Impact : ती 9 ठिकाणेच का? हल्ल्यांशी काय होता संबंध? गुप्तचर यंत्रणांनी मोहिम फत्ते केली...

मॉर्क ड्रीलची गांर्भियता लक्षात घेता सर्व संबंधित यंत्रणांनी अतिशय शिस्तबद्ध पध्दतीने काम करावे, नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन देखील डुडी यांनी केले आहे.

डुडी म्हणाले, केंद्र सरकारने युद्धजन्य परिस्थितीत देशाच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने मॉक ड्रिल करण्याचे सर्व राज्यांना निर्देश दिले आहेत. युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्यास कमीत कमी वेळेत अधिकाधिक नागरिकांपर्यंत मार्गदर्शन आणि मदत पोहोचविण्यासाठी खबरदारी घेण्याच्यादृष्टीने दक्षता म्हणून मॉक ड्रील घेत आहोत. यावेळी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास जीवितहानी टाळण्याच्यादृष्टीने विविध प्रात्यक्षिके केली जाणार आहेत,त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाण्याची गरज नाही.

पोलिस, महापालिकेचाही सहभाग

केंद्रीय संरक्षण दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ), जिल्हा प्रशासन, पोलीस, महानगरपालिका, नगरपालिका, आरोग्य, अग्निशमन दल, महाविद्यालयीन विद्यार्थी, राष्ट्रीय छात्रसेना, राष्ट्रीय सेवा योजना आणि नेहरु युवा केंद्राचे समन्वयक आदी या मॉक ड्रीलमध्ये सहभागी होणार आहेत.

Mock Drill
Top 10 News : ऑपरेशन सिंदूरची ‘A to Z’ कहाणी, मोदीजींच्या लेकींचं कुंकू तुम्ही पुसलं, चौंडीत मंत्र्यांचा थाट: वाचा महत्वाच्या घडामोडी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com