Mohsin Shaikh Case : मोहसीन शेख हत्या प्रकरण; धनंजय देसाईसह 20 जणांची निर्दोष मुक्तता

Mohsin Shaikh Case : धनंजय देसाईसह २० जणांवर या हत्येचा आरोप होता
Dhananjay Desai
Dhananjay Desai Sarkarnama
Published on
Updated on

Mohsin Shaikh Case : पुण्यातील मोहसीन शेख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींची पुराव्याअभावी पुणे सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. हिंदू राष्ट्र सेनेचा अध्यक्ष धनंजय देसाईसह २० जणांवर या हत्येचा आरोप होता. हे प्रकरण संपूर्ण देशभरात गाजलं होतं.

पुण्यातील एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या मोहसीन शेखची २ जून २०१४ रोजी जमावाने हत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर हिंदू राष्ट्र सेनेचा अध्यक्ष धनंजय देसाईसह २० जणांना पोलिसांनी येरवड्यातून अटक केली होती.

Dhananjay Desai
Sambhaji Raje News : संभाजीराजेंनी घेतली कट्टर भाजपविरोधक मुख्यमंत्र्यांची भेट : महाराष्ट्रात रंगली ‘या’ गोष्टीची चर्चा!

काय आहे नेमके प्रकरण?

मोहसीन शेख हा तरुण एका आयटी कंपनीत काम करत होता. तो मूळचा सोलापूरचा होता. मात्र, तो कामासाठी पुण्यात स्थायिक झाला होता. पण पुणे येथील हडपसरमध्ये २ जून २०१४ ला दंगल उसळली होती. या दंगलीत मोहसीनचा मृत्यू झाला होता.

Dhananjay Desai
Phaltan : गडकरींच्या कार्यक्रमाला रामराजेंची उपस्थिती; अनेकांच्या भुवया उंचावल्या

या घटनेनंतर मोहसीनचा भाऊ मोबीन मोहंमद सादीक शेख याने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानंतर पोलिसांनी हिंदू राष्ट्रसेनेचा अध्यक्ष धनंजय देसाईसह (Dhananjay Desai) २० जणांना अटक केली होती. महापुरुषांबाबत वादग्रस्त पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे ही दंगल उसळली होती.

Dhananjay Desai
Dada Bhuse News : ज्या ठिकाणचे कुंकू लावले त्या ठिकाणी सुखाने नांदा ;दादा भुसेंचा अद्वय हिरेंवर हल्लाबोल

हिंदू राष्ट्र सेनेच्या काही कार्यकर्त्यांनी मोहसीनला मारहाण केली होती. या मारहाणीत मोहसीनचा मृत्यू झाला होता. आता या प्रकरणामध्ये पुणे सत्र न्यायालयाने हिंदूराष्ट्र सेनेचा अध्यक्ष धनंजय देसाईसह २० जणांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com