Molestation Allegation : अश्लील हावभाव, शरीरसुखाची मागणी..., महिला पदाधिकाऱ्याच्या आरोपानंतर माजी आमदाराने मौन सोडले, काय घडलं ते सांगितलं

Gautam Chabukswar PCMC : माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांनी आपल्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप महिला पदाधिकाऱ्याने केला होता. त्याला चाबुकस्वार यांनी उत्तर दिले आहे.
Former MLA Gautam Chabukswar addresses allegations after a woman accused him of molestation.
Former MLA Gautam Chabukswar addresses allegations after a woman accused him of molestation.sarkarnama
Published on
Updated on

Gautam Chabukswar : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांच्यावर पक्षात पदाधिकारी असलेल्या महिलेने गंभीर आरोप केले. चाबुकस्वार हे आपल्याशी गैरवर्तन करत होते. अश्लील हावभाव करत त्यांनी शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप महिलेने केला होता. तसेच त्यांची मागणी मान्य केली नाही म्हणून आपले महापालिका निवडणुकीत तिकीट कापल्याचे म्हटले.

या आरोपानंतर माजी आमदार चाबुकस्वार यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत या खुलासा केला. ते म्हणाले, 'महिलेने द्वेषापोटी माझ्यावर मानहानीकारक आरोप केले आहेत. यामागील बोलविता धनी कोणी वेगळाच आहे. लवकरच त्याचे नावही समोर येईल आणि दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल.'

'महिलेला दापोडी प्रभाग क्रमांक ३० येथून उमेदवारी मिळाली नाही; म्हणून हे खोडसाळपणाचे आरोप केले आहेत. याबाबत मी पक्षातील वरिष्ठांकडे तक्रार केली आहे. त्यांच्या निर्देशानुसार योग्य ती कारवाई या महिलेवर होईल.', असे देखील त्यांनी सांगितले.

Former MLA Gautam Chabukswar addresses allegations after a woman accused him of molestation.
Nagpur Municipal Election : हायव्होल्टेज ड्रामा; भाजपच्या ‘त्या’ उमेदवाराला कार्यकर्त्यांनीच डांबलं घरात, नेत्यांची धावपळ

महापालिकेच्या निवडणुकी संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शहरातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. महिलेन अनुसूचित जाती जमातीच्या राखीव जागेवरून उमेदवारी मागितली होती. मात्र ती जागा पुरुष उमेदवारासाठी राखीव असल्यामुळे महिला उमेदवारांना तिकीट देण्यास निवड समितीने सर्वानुमते नकार दिला.

उमेदवारी सर्वानुमते नाकारली

पुरुष उमेदवार सक्षम असल्यामुळे महिलांना उमेदवारी द्यायची नाही असे सर्वानुमते ठरले. आपल्याला तिकीट मिळाले नाही तर मी चाबुकस्वार यांच्या कार्यालयासमोर जाळून घेईल अशी धमकी संबंधित महिलेले दिली. परंतु निवड प्रक्रियेमध्ये मी फक्त सहभागी होतो आणि सक्षम पुरुष उमेदवार असल्यामुळे सदर महिलेस उमेदवारी सर्वानुमते नाकारण्यात आली, असे देखील चाबूकस्वार यांनी सांगितले.

Former MLA Gautam Chabukswar addresses allegations after a woman accused him of molestation.
Kolhapur Corporation Election : कोल्हापुरात 'हायहोल्टेज ड्रामा!' बंडखोरांचे फोन 'नॉट रीचेबल', तर एका जागेसाठी मोठी फिल्डिंग; आज काय घडणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com