Moshi Accident: मोशी इमारत दुर्घटना प्रकरण: महापालिका आयुक्त 'अ‍ॅक्शन मोड'वर; सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार

Moshi Case: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मोशी येथे घडलेल्या इमारत दुर्घटना कोसळल्याची भीषण दुर्घटना घडली आहे. ही दुर्घटना पीसीएमसीच्या कचरा डेपो येथे घडली आहे. येथील 'वेस्ट-टू-एनर्जी' प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कचऱ्याचा डोंगर कोसळल्यानं 8 जुलै रोजी ही इमारत जमीनदोस्त झाली होती. या दुर्घटनेत 9 कामगारांचा मृत्यू झाला असून, तब्बल 81 तासांनंतर शोधकार्य पूर्ण झाले आहे.
Moshi Incident
Moshi IncidentSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मोशी येथे घडलेल्या इमारत दुर्घटना कोसळल्याची भीषण दुर्घटना घडली आहे. ही दुर्घटना पीसीएमसीच्या कचरा डेपो येथे घडली आहे. येथील 'वेस्ट-टू-एनर्जी' प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कचऱ्याचा डोंगर कोसळल्यानं 8 जुलै रोजी ही इमारत जमीनदोस्त झाली होती. या दुर्घटनेत 9 कामगारांचा मृत्यू झाला असून, तब्बल 81 तासांनंतर शोधकार्य पूर्ण झाले आहे. आता याप्रकरणी कारवाईला वेग आला आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे (PCMC) आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी तब्बल चार दिवसांनी मोशी इमारत दुर्घटना प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी महापालिकेच्या आयुक्तांनी पर्यावरण विभागाचे प्रमुख संजय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट यांचा कार्यभार काढून घेतल्याची माहिती समोर येत आहे.

तसेच मोशी इमारत दुर्घटनेप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या दुर्घटनेत पालिकेच्या पर्यावरण विभागाचे प्रमुख संजय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट यांच्या देखील प्रथमदर्शनी दिसून येत आहे. त्यामुळे त्यांच्यावरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मोशी येथील 9 निष्पाप कामगारांना जीव गमवावा लागलेल्या दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या वरच्या दोन्ही मजल्याला पूर्णत्वाचा दाखला देण्यात आला नसल्याचंही समोर आलं होतं. तर नगरविकास विभागानेही या दुर्घटनेबाबत महत्त्वाचा निर्णय घेताना विभागीय आयुक्त शीतल तेलींच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय इमारत दुर्घटनेसाठी चौकशी समिती नियुक्त केली आहे.

Moshi Incident
Sangli News: मोठी बातमी: जयंत पाटलांना अवघ्या 2 दिवसांत सलग दुसरा धक्का; ईश्वरपूरच्या नगराध्यक्षांचे बंधूही ठरले अपात्र

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोशी इमारत दुर्घटना प्रकरणाची गंभीर दखल घेताना भोसरीचे आमदार महेश लांडगे, महापौर रवी लांडगे यांच्यासह महत्त्वाची बैठक घेतली होती. या बैठकीनंतर पिंपरी चिंचवड महापालिकेनेही या इमारत दुर्घटनेबाबत विविध पातळीवर कठोर कारवाईसाठी पावले उचलली आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्तांनी आपत्ती व्यवस्थापन सहाय्यक आयुक्त वगळता सर्व त्रयस्थ विभागातील उच्च अधिकारी नियुक्त करण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे एक महिन्याच्या आत प्राथमिक आणि दोन महिन्यांच्या आत अंतिम चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

Moshi Incident
BJP rally : हिशेब होणार? बालेकिल्ल्यात दुसऱ्याच उमेदवाराच्या प्रचाराचा नारळ फोडताना भाजप नेत्याला रडू कोसळलं! काँग्रेस फायद्यात?

तसेच कंत्राटदार कंपनी 'अँटोनी लारा रिन्युएबल' या कंपनीवरही कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. ही कंपनीच इमारत दुर्घटनेला जबाबदार असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे सुरुवातीला कंपनीला क्लीन चीट देण्याच्या भूमिकेत असलेल्या आयुक्तांनी आता कारवाई दिशेनं पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com