Loksabha Election : सुनेत्रा पवारांच्या विजयासाठी 'काय पण', अजितदादा घेणार हर्षवर्धन पाटलांची भेट

Ajit Pawar News : सुनेत्र पवार यांना बारामतीतून महायुतीची उमेदवारी घोषित झाल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी सहकार्य न करण्याची भूमिका घेतली होती. देवेंद्र फडणवीस यांना भेटून हर्षवर्धन पाटील यांनी आपली भूमिका मांडली होती.
Ajit Pawar, Harshvardhan Patil
Ajit Pawar, Harshvardhan Patil Sarkranama
Published on
Updated on

Loksabha Election : राजकारणात कोणी कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो, याचा प्रत्यय महाराष्ट्राच्या राजकारणात येतो आहे. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसने मिळून राज्यात सरकार स्थापन केले होते. त्यानंतर अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी भाजप, शिवसेना (शिंदे गट) यांच्या महायुतीत सहभागी झाली. लोकसभा निवडणुकीमध्येदेखील आपल्या उमेदवाराचा विजय निश्चित करण्यासाठी शत्रूंना मित्र बनवण्याची वेळ नेत्यांवर आली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्र पवार यांच्या विजयासाठी अजित पवार यांनी कंबर कसली आहे. एकमेकांचे राजकीय विरोधक असलेल्या हर्षवर्धन पाटील यांच्या घरी अजित पवार सहकुटुंब जाणार आहेत.

Ajit Pawar, Harshvardhan Patil
Rohit Pawar Vs Ajit Pawar : अजितदादा सत्तेपासून दूर राहूच शकत नाहीत ; रोहित पवारांची टीका

19 एप्रिलला अजित पवार (ajit pawar) सहकुटुंब हर्षवर्धन पाटील यांच्या भेटीला जाणार आहेत. पवार कुटुंबीय पाटील यांच्या निवासस्थानी स्नेहभोजन घेणार आहेत. त्यानंतर अजित पवार कार्यकर्त्यांशीदेखील संवाद साधतील. अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील हे राजकीय विरोधक. हर्षवर्धन यांना पराभूत करत अजित पवारांचे विश्वासून दत्तात्रय भरणे विधानसभेत विजयी झाले होते. हर्षवर्धन पाटलांकडून (Harshvardhan Patil) भरणे यांच्याकडून आपल्या कार्यकर्त्यांना त्रास देण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत होता.

सुनेत्र पवार यांना बारामतीतून महायुतीची उमेदवारी घोषित झाल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी सहकार्य न करण्याची भूमिका घेतली होती. देवेंद्र फडणवीस यांना भेटून हर्षवर्धन पाटील यांनी आपली भूमिका मांडली होती. त्यानंतर इंदापूरमध्ये येत देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतली. इंदापूरचे पालकत्व घेत असल्याचे फडणवीस यांनी जाहीर केले. त्यामुळे सुनेत्रा पवार यांचा प्रचार हर्षवर्धन पाटील करणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

स्नेहभोजनानंतर हर्षवर्धन पाटील, अजित पवार एक दिलाने काम करतील याकडे बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी दौंडमध्ये प्रेमसुख कटारिया यांची भेट घेतली होती. त्यामुळे कटारिया शरद पवारांना मदत करणार, अशा चर्चा होत्या. मात्र, सुनेत्र पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी एक दिवस आधी प्रेमसुख कटारिया यांची अजित पवारांनी भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली.

R

Ajit Pawar, Harshvardhan Patil
Prakash Ambedkar News : 'मुस्लिम मते हवीत पण उमेदवार नको', प्रकाश आंबेडकरांचा 'मविआ'वर निशाणा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com