Sanjay Raut : "शाहांबरोबर 'मातोश्री'त बंद खोलीत चर्चा झाली नाही", मुख्यमंत्र्यांच्या दाव्यावर राऊत प्रत्युत्तर देत म्हणाले...

Sanjay Raut On Eknath Shinde : "मोदी आणि शाहांबरोबर राहून मुख्यमंत्री शिंदेंना खोटं बोलण्याचं व्यसन जडलं आहे," अशी टीका राऊतांनी केली आहे.
Sanjay Raut Eknath Shinde
Sanjay Raut Eknath ShindeAkshay Sabale
Published on
Updated on

दिल्लीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी अजित पवार आणि अशोक चव्हाणांबरोबर उद्धव ठाकरे गेले होते. तेव्हा आतमध्ये घाली लोटांगण केले. सत्ता सोडायला तयार झाले, मला म्हणाले, पुढं आपल्याला सत्ता मिळेल का? म्हणजे सत्तेसाठी हे काहीही करायला होते. तसेच, अमित शाह यांच्याबरोबर बंद खोलीत चर्चा झाली नाही, असा मोठा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी केला होता. याला शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Sanjay Raut Eknath Shinde
Aaditya Thackeray : "राहुल गांधींना पंतप्रधान व्हायचं असेल तर भाजपत जावे, कारण...", आदित्य ठाकरेंचं विधान

"किती खोटे बोलातात हे. मग, मिस्टर अमित शाह 'मातोश्री'त कशासाठी आले होते, हा प्रश्न या महाशयांनी स्वत:ला विचारावा. बंद दाराआड चर्चा करताना हे ( एकनाथ शिंदे ) 'मातोश्री'वर नव्हते. मी तिकडे उपस्थित होतो. यांना काय स्थान होते? कोण होते? हे पक्षाचे नेतेही नव्हते. आम्ही सगळ्यांनी मिळून यांना पक्षाचा नेता केलं," अशी टीका राऊतांनी ( Sanjay Raut ) मुख्यमंत्री शिंदेंवर केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"बाळासाहेबांच्या खोलीत अमित शाह आणि उद्धव ठाकरेंवर चर्चा झाली होती. येथे इतर भाजपचे नेते होते. हे भाजपचे गुलाम आणि नोकर झाले आहेत. यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे अशाप्रकारची बेताल वक्तव्य करतात. अमित शाह 'मातोश्री'वर कशासाठी आले होते? याचं उत्तर महाशयांनी द्यावं," असं आव्हान राऊतांनी मुख्यमंत्री शिंदेंना दिलं आहे.

Sanjay Raut Eknath Shinde
Ashok Chavan-Nana Patole : अशोक चव्हाणांच्या जाण्याने नानांना वेदना? छेडली दर्दभरी गझल...

"मोदी आणि शाहांबरोबर राहून मुख्यमंत्री शिंदेंना खोटं बोलण्याचं व्यसन जडलं आहे. देवेंद्र फडणवीसांनी सत्तेचं समसमान वाटप होणार असल्याचं सांगितलं होतं. हे रेकॉर्डवर आहे. यांच्या कानात आता बोळे बसले आहेत का? महाराष्ट्र यांना धडा शिकवेल," असा इशारा राऊतांनी मुख्यमंत्री शिंदेंना दिला आहे.

Sanjay Raut Eknath Shinde
Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांनी धनंजय मुंडेंची लायकीच काढली; म्हणाले, 'ज्याच्या रक्तात गद्दारी...'

"आम्ही पळून जाणारे पळपुटे नाही आहोत. बाळासाहेबांची शिवसेना आम्ही दिल्लीच्या पायाशी ठेवली नाही. डुप्लिकेट शिवसेनेच्या अधिवेशनात नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्याचा ठराव मांडण्यात आला. ही लाचारी कशासाठी? बाळासाहेब ठाकरे असते, तर यांचा कडेलोट केला असता. हिंमत असेल तर मुंबई आणि ठाणे महापालिकेच्या निवडणुका घ्या," असं आव्हान राऊतांनी मुख्यमंत्र्यांना दिलं आहे.

Sanjay Raut Eknath Shinde
BJP Political News : 50 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच...; 'सहकार' क्षेत्रातही भाजपचा बोलबाला!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com