Maratha Reservation : भुजबळांना धक्का? जरांगे-पाटलांच्या 'या' मागणीवर मंत्रालयात काम सुरू

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे-पाटलांच्या आंदोलनाचा नववा दिवस असताना सरकारी यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत.
chhagan bhujbal manoj jarange patil
chhagan bhujbal manoj jarange patilsarkarnama
Published on
Updated on

मराठा आरक्षणाचा ( Maratha Reservation ) प्रश्न ऐरणीवर आला आहे. 'सगेसोयरे' या अध्यादेशाबाबत हरकतींना मुदतवाढीची मागणी मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी केली होती. पण, ही मागणी फेटाळण्यात आली आहे. त्यामुळे आज ( 18 फेब्रुवारी ) मंत्रालयात सुट्टीच्या दिवशीही 266 अधिकारी काम करून याबाबत कार्यवाही करतील.

chhagan bhujbal manoj jarange patil
Sanjay Raut : "शाहांबरोबर 'मातोश्री'त बंद खोलीत चर्चा झाली नाही", मुख्यमंत्र्यांच्या दाव्यावर राऊत प्रत्युत्तर देत म्हणाले...

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील ( Manoj Jarange Patil ) यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. आज आंदोलनाचा नववा दिवस असल्याने त्यांची प्रकृती स्थिर आहे. या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा देखील सक्रिय झाल्या आहेत. मंगळवारी होणाऱ्या विशेष अधिवेशनात 'सगेसोयरे' या अध्यादेशाचा कायदा पारित करण्यासाठी सामाजिक न्याय विभाग रात्रंदिवस कामाला जुंपला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

रविवारचा दिवस असूनही 266 अधिकारी कामावर आहेत. यासंदर्भात सामाजिक न्याय विभागाने जात प्रमाणपत्र व जात प्रमाणपत्र पडताळणी अधिनियम 2000, नियम 2012 यामध्ये दुरुस्तीसाठी 26 जानेवारी 2024 ला अधिसूचना काढली होती. त्यावर सुमारे चार लाख हरकती प्राप्त झाल्या आहेत. या हरकतींचा निपटारा करण्याचे काम कालपासून सुरू करण्यात आले आहे. यात एकाच व्यक्तीने अनेक हरकती घेतलेले असल्यास ते शोधण्यासाठी हरकती घेतलेल्यांची नावे संपर्क आणि दूरध्वनी क्रमांक संकलित करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. हे काम लवकरच पूर्ण करून सगेसोयरे अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी मंगळवारी होणाऱ्या विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याची सर्व तयारी करण्यात आली आहे.

chhagan bhujbal manoj jarange patil
Aaditya Thackeray : "राहुल गांधींना पंतप्रधान व्हायचं असेल तर भाजपत जावे, कारण...", आदित्य ठाकरेंचं विधान

या प्रक्रियेला आगामी काळात न्यायालयात आव्हान दिले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे याविषयी कोणत्याही समाजाने हरकती घेऊ नये, म्हणून सर्व कामकाजाचे व्हिडिओ चित्रण करण्यात येत आहे. सुट्टीच्या दिवशी देखील मंत्रालयात 266 अधिकारी सचिव भांगे यांच्या उपस्थितीत या विषयावर काम करीत आहेत. एकीकडे मनोज जरांगे-पाटील यांचे अन्नत्याग आंदोलन आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता जाहीर होण्याचे संकट अशा क्लिष्ट स्थितीत सामाजिक न्याय विभाग या संदर्भात कार्यरत आहे. त्यामुळे शनिवार आणि रविवारसह सोमवारी होणाऱ्या शिवजयंतीच्या रजेच्या काळातही हा विभाग काम करणार आहे.

( Edited By : Akshay Sabale )

chhagan bhujbal manoj jarange patil
Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांनी धनंजय मुंडेंची लायकीच काढली; म्हणाले, 'ज्याच्या रक्तात गद्दारी...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com