MPSC Protest: MPSC आंदोलनात राजकीय हस्तक्षेप? उद्याचं आंदोलन रद्द; विद्यार्थ्यांमध्ये दोन गट, आता 2 ऑक्टोबरला ‘सत्याग्रह’

MPSC agitation Pune: महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी २ ऑक्टोबर रोजी विद्यार्थी आता 'सत्याग्रह' करणार आहेत. "MPSC च्या भ्रष्ट अध्यक्षांचे विसर्जन झाल्याशिवाय माघार नाही," असा ठाम निर्धार विद्यार्थी प्रतिनिधींनी व्यक्त केला आहे.
MPSC student Protest.
MPSC student Protest.Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune News : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी, परीक्षा पद्धती आणि विद्यार्थ्यांच्या इतर प्रलंबित प्रश्नांवरून पुण्यात वातावरण चांगलेच तापले आहे. आंदोलनाला राजकीय स्वरूप दिले जात असल्याच्या आरोपांवरून विद्यार्थ्यांमध्ये दोन गट पडल्याचे चित्र समोर आले असतानाच, आता २७ सप्टेंबर रोजी होणारे आंदोलन पुढे ढकलण्यात आले असून ते २ ऑक्टोबर रोजी (गांधी जयंती) 'सत्याग्रह' म्हणून केले जाणार आहे.

​

पोलीस आयुक्तांच्या विनंतीवरून आंदोलन पुढे ढकलले

​MPSC च्या विद्यार्थ्यांनी घोषित केलेल्या आंदोलनाबाबत चर्चा करण्यासाठी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी विद्यार्थी प्रतिनिधींशी बैठक घेतली. गेल्या १२ दिवसांपासून गणेशोत्सवाच्या बंदोबस्तामुळे पोलीस दलावर प्रचंड ताण असल्याने २७ सप्टेंबरचे आंदोलन पुढे ढकलण्याची विनंती पोलीस प्रशासनाने केली. पोलीस दलाचा ताण विचारात घेऊन विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींनी ही विनंती मान्य केली आहे.

MPSC student Protest.
Maharashtra Drought 2026: दुष्काळ जाहीर, आता मदत कधी? पंचनामा ते GPS सर्वेक्षण; GR मध्ये सगळं स्पष्ट

ज्यांनी जगाला सत्याग्रहाचा मार्ग दाखवला, त्या महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी म्हणजेच २ ऑक्टोबर रोजी विद्यार्थी आता 'सत्याग्रह' करणार आहेत. "MPSC च्या भ्रष्ट अध्यक्षांचे विसर्जन झाल्याशिवाय माघार नाही," असा ठाम निर्धार विद्यार्थी प्रतिनिधींनी व्यक्त केला आहे.

MPSC student Protest.
Maharashtra Drought 2026: राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर; 75 टक्के महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत

तर दुसरीकडे या आंदोलनाला राजकीय स्वरूप दिले जात असल्याचा आक्षेप काही विद्यार्थ्यांनी घेतल्याने आंदोलनाच्या भूमिकेवरूनच दोन गट समोर आले आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलन हवे, मात्र त्यामध्ये राजकीय पक्षांचा हस्तक्षेप नको, अशी भूमिका एका गटातील विद्यार्थी प्रतिनिधींकडून मांडण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणाऱ्या विद्यार्थी प्रतिनिधी निखिल पाटील यांनी राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या आंदोलनावर प्रश्न उपस्थित केला होता. हे आंदोलन विद्यार्थ्यांचे नसून राजकीय पक्षाचे आंदोलन असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

MPSC student Protest.
Top 10 News : दुष्काळ जाहीर, शेतकऱ्यांना मिळणार 12 सवलती; भुसे-हिरेंमध्ये पुन्हा जुंपली यासह वाचा Top Ten राजकीय घडामोडी

दोन गटांमधील मतभेद २ ऑक्टोबरला दिसणार?

आता २ ऑक्टोबरच्या सत्याग्रहात विद्यार्थ्यांच्या दोन्ही गटांची भूमिका काय राहणार, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. राजकीय हस्तक्षेपाला विरोध करणारे विद्यार्थी या आंदोलनात सहभागी होणार का, तर दुसऱ्या बाजूला राजकीय नेत्यांच्या पाठिंब्याने आंदोलन पुढे नेणाऱ्या गटाची भूमिका काय राहणार, याकडे पुण्यातील स्पर्धा परीक्षा वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याबरोबरच तुकाराम मुंढे आणि सुनील गेडाम यांची आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्याची मागणी तसेच परीक्षा ऑनलाइनऐवजी ऑफलाइन पद्धतीने घेण्याचा मुद्दा आंदोलनाच्या केंद्रस्थानी आहे. त्यामुळे २ ऑक्टोबरच्या सत्याग्रहातून विद्यार्थ्यांमधील मतभेद आणखी स्पष्ट होतात की दोन्ही गट पुन्हा एकत्र येतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com