Rupali Patil Thombare : MPSC च्या विद्यार्थ्यांचे आंदोलन काँग्रेसने वेठीस धरले, रुपाली पाटील ठोंबरे यांचा गंभीर आरोप

MPSC Students Protest : रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या, सुरुवातीपासून मी या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. मात्र, आंदोलनात राजकीय लोकांचा शिरकाव झाला आहे.
Rupali Patil Thombare
Rupali Patil Thombare Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : आयबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीची संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही 25 ऑगस्ट रोजी एकाच दिवशी आल्याने पुण्यात एमपीएससीच्या (MPSC)विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु होते. मात्र, आज एमपीएससीकडून घेण्यात येणारी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय ट्विट करत जाहीर करण्यात आला. परीक्षेचे तारीख पुढे ढकलली असली तरी विद्यार्थी आंदोलनावर ठाम आहेत.

परीक्षेची तारीख जाहीर करावी, कृषीच्या जागा कधी काढणार, संयुक्त परीक्षेची तारीख जाहीर केली नाही, असा आक्षेप विद्यार्थ्यांनी घेतला. मात्र, परीक्षा नंतर घेण्याचे जाहीर करूनही विद्यार्थी आंदोलन करत असल्याने राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी आंदोलनाला भेट देत विद्यार्थ्यांना पाठींबा दिला होता. रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या, विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या सरकारने पूर्ण केल्या आहेत. एमपीएससीने नोटिफिकेशन काढले आहे. मात्र, पॉलिटिकल लोकांना तेवढी अक्कल नसल्याने हे आंदोलन सुरू ठेवण्यात येत आहे. हे आंदोलन काँग्रेसकडून वेठीस धरण्यात येत आहे

Rupali Patil Thombare
MPSC Aspirants Protest : MPSC ची माघार, पण विद्यार्थ्यांचा आक्रोश कायम; आता एकच मिशन...नोटीफिकेशन

रुपाली पाटील ठोंबरे यांनी सांगितले, सुरुवातीपासून मी या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. विद्यार्थ्यांच्या प्रामुख्याने दोन मागण्या होत्या. दोन्ही परीक्षा एकाच वेळेस आल्याने परीक्षा पुढे ढकलावी ही मागणी विद्यार्थ्यांची होती. ती मागणी आम्ही सरकारपर्यंत पोहोचवली आणि आता आयोगाने याबाबतचे नोटिफिकेशन काढले आहे.

त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्या प्रमुख दोन मागण्या होत्या त्या सरकारने आयोगाच्या मार्फत पूर्ण केल्या आहेत. आता या आंदोलनामध्ये विद्यार्थी नाहीयेत. मला आंदोलनात काँग्रेसचे लोक दिसत असून त्यांच्याकडून हे आंदोलन वेठीस धरण्यात येत आहे.

(Edited By Roshan More)

Rupali Patil Thombare
Video Uddhav Thackeray : बदलापूर प्रकरणावरून उद्धव ठाकरे कडाडले, '...मुख्यमंत्री विकृत मानसिकतेचा, क्षमता नसलेला माणूस'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com