Nagpur News : समता बँक गैरव्यवहार; फरार आरोपीला हैद्राबादमधून 17 वर्षांनंतर अटक

CID investigation १९९७ ते २००७ या कालावधीत हा प्रकार घडला होता.याबाबत नागपूरच्या सीताबर्डी पोलिस ठाण्यात ५७ जणांविरुद्ध अपहाराचा गुन्हा दाखल केला होता.या गुन्ह्याचा तपास सीआयडीच्या नागपूर कार्यालयाकडून करण्यात येत होता.
Samata Bank Malpractice Fugitive accused arrested
Samata Bank Malpractice Fugitive accused arrestedsarkarnama

Pune News : नागपूरच्या समता सहकारी बँकेतील १४५ कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील फरारी आरोपीला सीआयडी पथकाने हैद्राबादमधून अटक केली. मागील १७ वर्षांपासून तो पुणे, मुंबई आणि तेलंगणा राज्यात स्वत:ची ओळख लपवून वास्तव्य करीत असल्याचे तपासात समोर आले आहे. विजयकुमार रामचंद्र दायमा (रा. फेअर व्ह्यू सोसायटी, गोदावरी होम्स, हैदराबाद) असे अटक केलेल्या फरार आरोपीचे नाव आहे.

नागपूर येथील समता सहकारी बॅंकेतील अधिकारी, कर्मचारी, बॅंकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळाने बनावट कर्जप्रकरणे सादर करुन १४५ कोटी ६० लाख रुपयांचा गैरव्यवहार केला होता. याप्रकरणी नागपूरमधील सीताबर्डी पोलिस ठाण्यात २००७ मध्ये अपहार, तसेच फसवणूक केल्याप्रकरणी ५७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. १९९७ ते २००७ या कालावधीत हा प्रकार घडला होता

.याबाबत नागपूरच्या सीताबर्डी पोलिस ठाण्यात ५७ जणांविरुद्ध अपहाराचा गुन्हा दाखल केला होता.या गुन्ह्याचा तपास सीआयडीच्या नागपूर कार्यालयाकडून करण्यात येत होता.बँकेचा कर्जदार असलेल्या दायमाने तारण न देता समता बँकेकडून कर्ज घेतले होते. या आर्थिक गैरव्यवहाराची व्याप्ती विचारात घेता या प्रकरणाचा तपास नागपूर पोलिसांकडून सीआयडीच्या नागपूर कार्यालयाकडे सोपविण्यात आला होता. सीआयडीच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत होता.

Samata Bank Malpractice Fugitive accused arrested
Nagpur Lok Sabha 2024 : नागपुरातील 108 माजी नगरसेवकांवर भाजपचा ‘वॉच’; लोकसभेतील लीडवरच ठरणार पालिकेचे तिकीट

दायमा गेली १७ वर्षे पुणे, मुंबई आणि तेलंगणा परिसरात ओळख लपवून वास्तव्य करत होता. तो हैदराबादमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती सीआयडीच्या पुणे कार्यालयातील पथकाला मिळाली होती. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला हैदराबाद येथून अटक केली. त्याला नागपूरमधील सीआयडीच्या ताब्यात देण्यात आले आहे.

(राजकारणातील महत्वाच्या बातम्यांच्या अपडेटस॒साठी सरकारनामाचे अधिकृत WhatsAppचॅनेल फॉलो करा)

सीआयडीच्या पुणे कार्यालयाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक प्रशांत बरडे, विशेष पोलिस महानिरिक्षक डॉ. दिलीप पाटील, पोलिस अधीक्षक वैशाली माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक आनंद रावडे, हेड कॉन्स्टेबल विकास कोळी, सुनील बनसोडे, प्रदिप चव्हाण यांनी काम पाहिले.

Edited By : Umesh Bambare

Samata Bank Malpractice Fugitive accused arrested
Pune Police News: मतदानापूर्वी पुणे पोलिस अलर्ट; 9 हजार 255 गुंडांची झाडाझडती; पैसे वाटपावर लक्ष

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com