NCP News: चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीत घडामोडींना वेग,रूपाली पाटलांचं थेट सुनेत्रा पवारांना पत्र; केली मोठ्या पदाची मागणी

Rupali Patil Thombare Letter News: गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत घडामोडींनी वेग घेतला असल्याचे पाहायला मिळत आहे. नाशिकमधील भोंदू बाबा खरात प्रकरणानंतर तत्कालीन महिला आयोगाच्या अध्यक्षा असलेल्या रूपाली चाकणकर यांना महिला आयोगाचे अध्यक्षपद तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला प्रदेशाध्यक्षपद सोडावं लागलं होतं.
Rupali Patil Thombare .jpg
Rupali Patil Thombare .jpgSarkarnama
Published on
Updated on

Pune News : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत घडामोडींनी वेग घेतला असल्याचे पाहायला मिळत आहे. नाशिकमधील भोंदू बाबा खरात प्रकरणानंतर तत्कालीन महिला आयोगाच्या अध्यक्षा असलेल्या रूपाली चाकणकर यांना महिला आयोगाचे अध्यक्षपद तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला प्रदेशाध्यक्षपद सोडावं लागलं होतं.

रूपाली पाटील ठोंबरे यांनी रुपाली चाकणकर यांना या दोन्ही पदापासून दूर करावं अशी मागणी सुरुवातीपासूनच लावून धरली होती. त्यानंतर दोन्ही पदाचा चाकणकर यांनी राजीनामा दिला. त्यानंतर आता रूपाली पाटील ठोंबरे यांनी खासदार पार्थ पवार यांना पत्र पाठवलं आहे. या पत्राची प्रत त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांना देखील दिली आहे.

या पत्रात रूपाली पाटील यांनी थेट उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्याकडे विधानपरिषद आमदारकी देण्याची मागणी केली असून आपण या पदासाठी सक्षम असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

पत्रात काय म्हटलं..?

रूपाली पाटील ठोंबरे या पदात म्हणाल्या, मी अॅड. रूपाली पाटील ठोंबरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निष्ठावंत कार्यकर्ती म्हणून मागील अनेक वर्षांपासून अजित पवार दादा यांच्या नेतृत्वाखाली सक्रियपणे कार्यरत आहे. तसेच माझी राजकीय कारकीर्द मागील वीस वर्षांची असून या काळात मी जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा दिला आहे.

Rupali Patil Thombare .jpg
Congress News: सत्यजीत तांबेंची टीका झोंबली; काँग्रेसचं जशास तसं प्रत्युत्तर; म्हणाले,'तुमच्या आवडत्या भाजपला व ज्यांच्या मांडीवर बसण्यात...'

माजी नगरसेविका व शहर सुधारणा समिती अध्यक्षा म्हणून काम करताना मी प्रशासनावर प्रभावी पकड ठेवून अनेक विकासकामे मार्गी लावली आहेत. पुणे महानगरपालिका तसेच पदवीधर निवडणुका लढविताना मला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे, ज्यातून माझे जनाधार व संघटन कौशल्य मी सिद्ध केले आहे.

मला सभागृहाचे नियम, प्रक्रिया व कामकाजाचे सखोल ज्ञान असून, मी प्रश्न मांडणे, शासनाला जबाबदार धरणे व जनतेच्या मुद्यांवर ठाम आणि आक्रमक भूमिका घेणे यात पारंगते आहे. एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून मी नेहमीच अन्यायाविरोधात ठामपणे उभी राहिले आहे आणि समाजातील दुर्बल घटकांसाठी प्रभावी आवाज बनले आहे.

Rupali Patil Thombare .jpg
Sanjay Raut Defamation Case: संजय राऊत मानहानी प्रकरणी सर्वात मोठी अपडेट; भाजप मंत्री नितेश राणेंविरुद्ध माझगाव कोर्टानं काढलं वॉरंट

आज पक्षाला अशा अभ्यासू, लढाऊ व निष्ठावंत महिला नेतृत्वाची गरज आहे, जी सभागृहात पक्षाची भूमिका ठामपणे मांडू शकेल आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देईल, त्या दृष्टीने मी स्वतःला सक्षम उमेदवार म्हणून आपणासमोर उमेदवारीची मागणी करत आहे. म्हणून आपणास नम्र विनंती आहे की, माझ्या कार्याचा व अनुभवाचा विचार करून मला विधानपरिषदेवर संधी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com