Ajit Pawar Politic's : भाजपचा पश्चिम महाराष्ट्राचा अध्यक्ष फोडून अजितदादांनी पुरंदर राष्ट्रवादीला आक्रमक चेहरा दिला

Jalindar Kamthe Rejoin NCP : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपमधील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जालिंदर कामठे यांना राष्ट्रवादीत दाखल करून पुरंदर, हडपसर भागात पक्ष बळकट करण्याची रणनीती राबविली आहे.
Jalindar Kamthe Rejoin NCP
Jalindar Kamthe Rejoin NCPSarkarnama
Published on
Updated on
  1. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे, इंदापूर आणि सोलापूरमध्ये पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी जालिंदर कामठे, मुरलीधर निंबाळकर, रोहन सुरवसे आदी नेत्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घडवून आणला.

  2. जालिंदर कामठे यांचा पुरंदरमध्ये पुनर्प्रवेश हा पक्षाला आक्रमक नेतृत्व देणारा व आगामी निवडणुकांसाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

  3. हडपसर, इंदापूर आणि भवानीनगर परिसरात नव्या नेत्यांच्या सामील होण्यामुळे झेडपी, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढण्याची अपेक्षा आहे.

Pune, 26 September : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (ता. 26 सप्टेंबर) इतर पक्षातील नेत्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रवेश करत बेरजेच्या राजकारणाची जुळवाजुळव सुरू केली आहे. विशेषतः भाजपमध्ये गेलेले पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांना स्वगृही आणत पुरंदर राष्ट्रवादी काँग्रेसला एक आक्रमक चेहरा देण्याचा प्रयत्न अजितदादांनी केला आहे.

तसेच, जिल्हा परिषद, पंचायत समितीबरोबरच हडपसर (Hadapsar) परिसरात पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. यापूर्वीच त्यांनी शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर यांना पक्षात आणून हडपसर भाग पक्षाचा बालेकिल्ला राहील, याची काळजी घेतली आहे. याशिवाय, इंदापूर, पुणे शहर आणि सोलापुरात पक्ष बळकट करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे.

भारतीय जनता पक्षाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष तथा पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे (पुरंदर), भूविकास बॅंकेचे माजी संचालक मुरलीधर निंबाळकर (इंदापूर), रोहन सुरवसे, मारुती किंडरे, स्वाती चिटणीस (पुणे) तसेच सोलापूर शहरातील काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यातून अजित पवार (Ajit Pawar) यांनी आगामी निवडणुकीची गोळाबेरीज सुरू केल्याचे स्पष्ट होत आहे.

जालिंदर कामठे हे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. मात्र, अजितदादांनी माजी आमदार संजय जगताप यांना बळ देताच कामठे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. मध्यंतरी माजी आमदार जगताप यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाणे पसंत केले. त्यानंतर कामठे यांनी स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला. त्यातूनच आज त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश केला. हा प्रवेश कामठे आणि राष्ट्रवादीसाठी महत्वाचा मानला जात आहे.

Jalindar Kamthe Rejoin NCP
Ajit Pawar : आमची भावकी पालकमंत्रिपदाची स्वप्नं बघत होती; पण 'मी तुला पाडणार' असे त्याला सांगितले होते : अजितदादांचा हल्ला

राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवार यांच्याकडे पुरंदरमधील दिगंबर दुर्गाडे हे एकमेव चेहरा होता. त्यांच्याकडे जिल्हा बॅंकेची जबाबदारी आहे. मात्र दुर्गाडे यांच्या राजकारणाला असलेल्या मर्यादा लक्षात घेऊन पुरंदर राष्ट्रवादी काँग्रेसला आक्रमक चेहऱ्याची गरज होती. ती कामठेंच्या पक्षप्रवेशामुळे भरून निघाली आहे. कारण कामठे यांची दिवे गराडे जिल्हा परिषद गटात निर्णायक ताकद आहे. तसेच हडपसर मतदारसंघातही त्यांना मानणारी जनता आहे. त्यामुळे त्यांचा झेडपी आणि पालिका असा फायदा होऊ शकतो.

भाजपचे संजय जगताप, शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे आणि इतर आक्रमक नेत्यांना अंगावर घेण्याची ताकद असलेला पुढारी राष्ट्रवादी काँग्रेस नव्हता. पण, कामठे हे काम लीलया करू शकतात. तसेच संपूर्ण तालुक्यात चालू शकणारा चेहरा म्हणून जालिंदर कामठेंकडे पाहिले जाते. तसेच, जुना जाणता चेहरा असल्याने आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीला त्याचा फायदा होऊ शकतो.

इंदापूर तालुक्यातील मुरलीधर निंबाळकर यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे भवानीनगर परिसरात पक्षाला आणखी बळकटी आली आहे. त्याचा फायदा आगामी झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकीत किती प्रमाणात होतो, हे पाहावे लागणार आहे. रोहन सुरवसे हे पुणे शहर काँग्रेसचे सरचिटणीस होते. विविध आंदोलनांच्या माध्यमातून त्यांनी आपली वेगळी ओळख बनवली आहे. त्यामुळे त्याचाही फायदा महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला होणार आहे.

Jalindar Kamthe Rejoin NCP
Dharashiv Collector Dance : धाराशिव कलेक्टरच्या डान्सबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील : योगेश कदमांनी थेटच सांगितले
  1. प्र: जालिंदर कामठे यांचा पक्षप्रवेश का महत्त्वाचा आहे?
    उ: पुरंदरमध्ये आक्रमक नेतृत्व देऊन झेडपी आणि पालिका निवडणुकांत फायदा मिळवण्यासाठी.

  2. प्र: अजित पवारांनी कोणकोणत्या भागात पक्ष बळकट करण्याचे प्रयत्न केले?
    उ: पुणे, इंदापूर, हडपसर आणि सोलापूर परिसरात.

  3. प्र: राष्ट्रवादीत कोणते नवे नेते सामील झाले?
    उ: जालिंदर कामठे, मुरलीधर निंबाळकर, रोहन सुरवसे, मारुती किंडरे, स्वाती चिटणीस आदी.

  4. प्र: मुरलीधर निंबाळकर यांच्या प्रवेशामुळे कोणत्या भागाला फायदा होणार आहे?
    उ: इंदापूर तालुक्यातील भवानीनगर परिसराला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com