Assembly Session 2024 : रात्री गावांवर घिरट्या घालणारं ‘ते’ ड्रोन आज विधानसभेत उतरलं!

Pune District Anil Deshmukh Drone Camera : विधानसभेत राष्ट्रवादीचे आमदार अनिल देशमुख यांनी ड्रोनचा मुद्दा उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधले.
Drone Issue in Assemby Session
Drone Issue in Assemby SessionSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : काही दिवसांपर्यंत पुणे जिल्ह्यातील अनेक गावांवर रात्री ड्रोन फिरत असल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. पोलिसांनाही या ड्रोनचं कोडं उलगडलं नाही. त्यामुळे त्याचे गुढ वाढतच चालले आहे. आज विधानसभेतही ड्रोनचा मुद्दा चर्चेला आला.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ड्रोनकडे सरकारचे लक्ष वेधले. खासदार अमोल कोल्हे यांनी देशमुखांच्या निदर्शनास ही बाब आणू दिली होती. पुणे जिल्ह्यात आंबेगाव, शिरूर, हवेली तालुक्यातील गावांवर मागील आठ दिवसांपासून रात्री 10.30 ते 11 च्या दरम्यान ड्रोन फिरत आहे, असे देशमुख यांनी सांगितले.

Drone Issue in Assemby Session
BJP Politics : भाजप लोकसभेचं आत्मचिंतन करणार; विधानसभेची रणनीतीही ठरवणार; आता 'या' दिवशी अमित शाह पुण्यात

या भागातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हे ड्रोन कशासाठी येत आहेत? गावातील लोकांनी पोलिसांकडेही तक्रार केली. त्यामुळे शासनाने याबाबतीत निवेदन करावे, अशी मागणी देशमुख यांनी विधानसभेत गुरूवारी केली.

कोल्हे यांनी एक्सवर पोस्ट करून ड्रोनबाबत सांगितले की, आंबेगाव-शिरूर मतदारसंघात आयोजित जनता दरबार उपक्रमात अनेक नागरिकांनी आंबेगाव, शिरूर, हवेली तालुक्यात रात्रीच्या वेळी ड्रोन्स फिरत असल्याची तक्रार केली होती. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असल्याचीही बाब यावेळी निदर्शनास आली.

Drone Issue in Assemby Session
Madhukarrao Chavan : धोतर, शुभ्र सदरा..! 5 वेळा आमदार, एकदा मंत्री राहिलेले 87 वर्षीय अण्णा विधानभवनात, आधार न घेता पायऱ्या उतरले

या विषयाचे गांभीर्य ओळखून मी तातडीने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत चर्चा केली. त्यांनी आज विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करून शिरूर लोकसभा मतदारसंघातील सामान्य जनतेच्या भावना मांडल्या. राज्य सरकारने याबाबत सखोल चौकशी होऊन सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी कोल्हेंनी केली आहे.

संपूर्ण जिल्ह्यात ड्रोनची भीती

केवळ आंबेगाव, शिरूर, हवेली तालुक्यातच नव्हे तर बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, भोर, मुळशी या तालुक्यांतील गावांमध्येही अज्ञात ड्रोन फिरत असल्याचा नागरिकांच्या तक्रारी होती. पोलिसांकडे याबाबतच्या अनेक तक्रारी आल्या. पण रात्रीच्या वेळी घिरट्या घालणारे ड्रोन कुणाचे, कशासाठी उडवलं जात आहे, याचा अजूनही उलगडा झालेला नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com